हैदराबाद : सुट्टीच्या दिवसाची सुरुवात चांगली होत नसल्याने अनेक नागरिक त्रस्त असतात. मात्र सुट्टीच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी तुम्हाला आपल्या रात्रीच्या नित्यक्रमात काही बदल करणे आवश्यक आहे. व्यायाम करणे, आंघोळ करणे, एखादे पुस्तक वाचून झोपायच्या आधी थोडावेळ घालवणे गरजेचे असते. तुम्ही आराम करून काही पथ्ये पाळल्याने नवीन दिवस अगदी ताजातवाना सुरू करू शकता. तुमच्या नवीन दिवसाची सुरुवात ताजीतवानी होण्यासाठी तुम्हाला ईटीव्ही भारतच्या वतीने काही टिप्स देण्यात येत आहेत, त्याचे पालन करुन तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात आनंदात करु शकता.
नियमित झोपेचे बनवा वेळापत्रक :झोपण्याच्या काही तास आधी तुमचा मेंदू तुमच्या नियमित झोपेची तयारी करू लागतो. त्यामुळे तुमच्या दिनचर्येसाठी उत्तम झोपेची आणि जागे होण्याची वेळ निवडण्याची तुम्हाला गरज आहे. त्यामुळे अशावेळी निवडून दररोज त्याचे पालन करा. अगदी आठवड्याच्या शेवटीही या वेळापत्रकाचे पालन करायचे विसरू नका. नियमित झोपेचे वेळापत्रक पाळल्याने तुमच्या मेंदूला झोपेच्या वेळी झोपेची जाणीव होण्यास मदत होते.
तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू दूर ठेवा :इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू रात्री जवळ ठेवल्याने झोपेवर विवपरित परिणाम करु शकतात. त्यामुळे लॅपटॉप, टेलिव्हिजन, स्मार्टफोन आणि टॅब्लेट हे सर्व निळा प्रकाश उत्सर्जित करतात. दूरदर्शन पाहणे किंवा सोशल मीडियाद्वारे ब्राउझ करणे रात्री शांत वाटत असले तरीही त्यामुळे तुम्ही विचलित होऊ शकता. यामुळे तुमचा मेंदू मेलाटोनिनचे उत्पादन दडपतो आणि जागृत राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी विश्रांतीसाठी थोडा वेळ शेड्यूल करण्याची गरज आहे.