नवी दिल्ली : भारतीय लोकसंख्येतील किमान ११ टक्के चिमुकल्यांना दात न निघण्याची समस्या मोठी गंभीर झाल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले. लहान चिमुकल्यामध्ये पीएएक्स ९ जीन दातांच्या विकासासाठी महत्वपूर्ण मानला जातो. त्यासह टूथ एजेनेसिस सारख्या स्थितीत पीएएक्स ९ जीनमुळे चिमुकल्यांमध्ये दात निघत नसल्याचे पुढे आले आहे. या कारणांचा शोध घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. मात्र बनारस हिंदू विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे पहिले संशोधन केल्याचा दावा केला आहे. दातांच्या विकारामधील हा सगळ्यात जास्त आढळणारा एक विकार असल्याचेही यावेळी संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
संशोधकांचा दावा :बनारस हिंदू विद्यापीठाच्या सेंटर फॉर जेनेटिक डिसऑर्डर्स विज्ञान संस्थेचे प्राध्यापक परिमल दास आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी प्रशांत रंजन यानी टूथ एजेनेसिस इन चिल्ड्रन ( Tooth agenesis in children ) या विकारासाठी नवीन उपचाराचा मार्ग सूचवला आहे. याप्रकारचा शोध लावून उपचार सूचवण्याचा ही पहिली वेळ असल्याचे बोलले जाते. पीएएक्स ९ मुटेशनमुळे टूथ एजेनेसिस होऊ शकतो. त्यामुळे या संशोधकांनी असे अनेक म्युटेंट पीएएक्स ९ च्या अनेक प्रकाराचा अभ्यास केला आहे. या दरम्यान सगळ्यात सहा पैथोजेनिक आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांचा परिणाम टूथ एजेनेसिस होऊ शकतो.
म्युटेंट प्रोटीनची संरचना :बनारस हिंदू विद्यापीठाच्या संशोधकांनी यापैकी पैथोजेनिक पीएएक्स 9 वेरिएंटचा अभ्यास केला. यावेळी त्यांनी एकाच ठिकाणी सर्व 6 म्युटेंट प्रोटीनच्या संरचनेत बदल होत असल्याचे दिसून आले. नंतर त्याचाच पुन्हा सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्यानंतर अशी काही ठिकाणे आहेत जी प्रथिने आणि प्रोटीन यांच्यात इंटरॅक्शमध्ये सहभागी नसल्याचे आढळून आले. मात्र प्रोटीन -प्रोटीन इंटरएक्शन आणि डीएनए-प्रोटीन इंटरएक्शन दात विकासासाठी आवश्यक असल्याची माहिती यावेळी संशोधकांनी दिली आहे.