महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Health Tips : जाणून घ्या, कुठल्याही स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार - Fasting

आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी बाजारात उपलब्ध असतात. पण काही गोष्टी कुठल्याही स्टोअरमध्ये उपलब्ध नसतात. चला तर मग जाणून घेवूया कुठल्याही स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या गोष्टींबद्दल.(Health Tips)

Health Tips
कुठल्याही स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार

By

Published : Nov 13, 2022, 3:31 PM IST

हैदराबाद: पुरेशी झोप: आपण झोपलेलो असताना आपला मेंदू कार्यरत राहून ही सर्व कामे करत असतो. म्हणून रात्रीच्या वेळी शांत आणि गाढ अशी पुरेशी झोप घेतल्यास आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठा आणि त्वचेचे आरोग्य या दोन गोष्टींसाठी शरीराला पुरेशी झोप (get enough sleep) मिळणे आवश्‍यक असते.

व्यायाम: व्यायाम (Exercise) हे औषध आहे. नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात. व्ययामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. नियमित व्यायामामध्ये; ताणण्याचे व्यायाम, एरोबिक्स आणि श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा. व्यायाम केल्याने माणसाला नवीन उर्जा प्राप्त होते. नियमित व्यायाम केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

चांगला मित्र एक परिपूर्ण मेडिकल स्टोअर: आयुष्यात चांगले मित्र असणे खुप महत्तवाचे आहे. चांगले मित्र एखाद्या औषधाप्रमाणे असतात. तुमच्या मनातील गोंधळ दूर करून सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी मित्र तुम्हाला प्रेरणा देतो, तुम्ही आजारी असताना किंवा अडचणीत असताना सतत लढायला प्रवृत्त करतो आणि कधी कधी तुमचा जोडीदार बनून तुमच्यासोबत व्यायाम करतो. म्हणूनच मित्र हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा असतो (friend is an immune booster), जो तुमच्या आरोग्यासाठीही चांगला असतो.

उपवास: पचनसंस्थेसाठीही उपवास (Fasting) फायदेशीर ठरतो. एका संशोधनानुसार, 62.33% लोकांना उपवासाच्या वेळी अपचनाची समस्या नव्हती, तर 27% लोकांना अपचन बरे झाले. उपवास केल्याने, शरीराची स्वतःची उपचार प्रणाली योग्यरित्या कार्य करते, ज्यामुळे शरीर अनेक प्रकारच्या समस्यांशी स्वतःहून लढू लागते.

आनंदी राहणे: जीवनातील विसंगतींना अनुसरून थोडासा विनोद करणे, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे, उत्तम कलाकृती, नाटके, साहित्य यांचे रसग्रहण करणे, थोडक्यात समग्रपणे जीवन जगणे यातूनच आनंदी वृत्ती तयार होते, जी जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते.

मन:शांती:कोणी काहीही करत असेल, किंवा कुणाबरोबर काय होत असेल, यामुळे मन आणि बुद्धीची शांती (Peace of mind) प्रभावित होऊ नये. असाच एखादा संकल्प तुमच्या मनात असला पाहिजे. जे जसं चालू आहे, ते तसं नेहमीच चालत राहील, पण कोणत्याही परिस्थितीत मनाच्या शांतीवर याचा परिणाम होऊ देऊ नये, शारीरिक आणि भावनिकही.

ABOUT THE AUTHOR

...view details