हैदराबाद :सुप्रसिद्ध टायटॅनिक जहाजाचा अपघात झाल्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे टायटॅनिक जाहाजाच्या अपघाताचा दिवस नागरिक कधीच विसरू शकत नाहीत. टायटॅनिक जहाज 10 एप्रिलला इंग्लंडमधील साऊथ हॅम्पटन येथून न्यूयॉर्कला सफरीवर निघाले होते. मात्र वाटेतच त्याचा अपगात झाला. त्यामुळे 15 एप्रिलला टायटॅनिकच्या स्मृतीदिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे नेमके काय होते टायटॅनिक जहाज, कशी झाली घटना याबाबतची माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
बंदरातच टळला होता टायटॅनिकचा अपघात : इंग्लंडमधील साऊथ हॅम्पटन येथून 10 एप्रिल 1912 ला टायटॅनिक जहाज न्यूयॉर्क शहराकडे प्रवाशी भरुन सफरीवर निघाले होते. कॅप्टन स्मिथ या अनुभवी कॅप्टन हे जहाज घेऊन या सफरीवर निघाले होते. विशेष म्हणजे या सफरीनंतर कॅटन स्मिथ निवृत्त होणार होते. जहाजावर एकूण 2227 प्रवाशी प्रवास करत होते. साऊथ हॅम्पटन येथून बंदरातून बाहेर पडत असतानाच टायटॅनिकच्या जवळ उभे असलेले एसएस न्यूयॉर्क या जहाजाचा दोर तुटला होता. ते जहाज टायटॅनिकवर धडकणार होते. मात्र तो अपघात टाळण्यात कॅटन स्मिथला यश आले. एका टगबोटीने एसएस न्यूयॉर्कला केवळ चार मिटरच्या अंतरावरुन वळवण्यात यश आले.