महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Tips For Oily Skin During Summer : उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे सहन करावा लागतो त्रास, या टीप्स वापरुन करा सुटका - मुक्ती

उन्हाळ्यात अनेक तरुणांना तेलकट त्वचेमुळे चांगलाच त्रास सहन करावा लागतो. मात्र काही टीप्स वापरुन तुम्ही तेलकट त्वचेपासून तुम्ही मुक्ती मिळवू शकता.

Tips For Oily Skin During Summer
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 12, 2023, 3:31 PM IST

हैदराबाद : तेलकट त्वचा असलेल्या नागरिकांना उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळा कमी त्रासदायक होण्यासाठी काही खबरदारी घेतल्यास तुम्ही या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टीप्स देणार आहोत, त्याचा वापर करुन तुम्ही हा उन्हाळा सुखकारक बनवू शकणार आहात.

चेहरा करा स्वच्छ : उन्हात थोडा वेळ घालवल्यानंतर त्वचेला जळजळ वाटणे सामान्य आहे. त्यामुळे तरुणांच्या चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडत राहतात. मात्र थंड पाण्याऐवजी क्लींजिंग मिल्क वापरल्याने चांगले परिणाम मिळतात.

त्वचेची घ्या दररोज काळजी :उन्हाळ्यात तरुणांनी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्वचा तेलकट होते. ऋतूनुसार ही उत्पादने निवडणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर त्वचा टॅन्स होण्याची शक्यता वाढते.

ऑइल ब्लॉटिंग पेपर वापरा :आवश्यक ती खबरदारी घेतल्यानंतरही तुमचा चेहरा तेलकट वाटत असेल, तर काळजी घेणे गरजेचे आहे. त्यावर मात करण्यासाठी तुम्ही ऑइल ब्लॉटिंग पेपर वापरू शकता. हा पेपर सोबत ठेऊन तेलकट चेहरा वाटल्यास पुसल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटू शकते आणि तुमचा चेहरा स्वच्छ दिसू शकतो. परंतु त्यांचा जास्त वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील अत्यावश्यक तेल नष्ट होऊ शकतात. त्यामुळे त्यांचा वापर नियंत्रित प्रमाणात करणे आवश्यक आहे.

तेल आधारित मेकअप वापरणे टाळा : आंघोळीनंतर मेकअप लावणे किंवा चेहरा धुणे ही आजकालची सवय झाली आहे. परंतु त्वचेचा तेलकटपणा दीर्घकाळ रोखणारी उत्पादने वापरण्याची खात्री करणे देखील आवश्यक आहे. हे मेकअप अधिक काळ टिकण्यास देखील मदत करेल. त्यामुळे तेल आधारित उत्पादनांपासून परावृत्त केल्याने तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते.

पोषण : उन्हाळ्यात आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास देखील मोठ्या प्रमाणात मदत होते. उन्हाळ्यात तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास त्वचेसाठी अधिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खा.

होममेड फेस पॅक :केळीच्या पल्पचा ओट्स आणि दुधाचा फेस पॅक बनवा आणि 20-30 मिनिटे लावून थंड पाण्याने धुवा. किंवा काकडी आणि लिंबाच्या रसात हळद घालून दुसरा फेस पॅक बनवा आणि 10-15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि थंड पाण्याने धुवा. हे फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता. यामुळे तुमच्या त्वचेला चांगलाच फरक पडल्याचे दिसून येईल.

हेही वाचा - Gujarat Top Street Food : जगभरात पसरले आहेत गुजरातचे खाद्यपदार्थ, जाणून घ्या गुजरातच्या टॉप स्ट्रीट फूडची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details