महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स आहेत? 'या' टीप्स ठरू शकतात फायदेशीर - dark circle treatment etv bharat marathi

ओव्हरटाईम स्क्रीनटाईम आपल्या डोळ्यांच्या आरोग्याबरोबरच त्याच्या आजूबाजूच्या त्वचेवरही परिणाम करते, ज्यामुळे डोळ्यांभोवती डार्क सर्कल सारख्या समस्या दिसू लागतात. या समस्येपासून सुटका कसा मिळेल? याबाबत आपण जाणून घेऊया.

Dark circles
डार्क सर्कल्स

By

Published : Oct 13, 2021, 5:21 PM IST

कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला असला आणि जीवन पूर्वपदावर आले असले तरी, मजबुरीने म्हणावे किंवा गरजेमुळे, सर्व वयोगटांतील लोकांचा बहुतेक वेळ संगणक, स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि टीव्ही पाहण्यात जातो. या कारणांमुळे लोकांमध्ये ड्राई आय किंवा दृष्टीत कमजोरीसोबतच डोळ्यांच्या आजूबाजूला काळ्या वर्तुळाच्या समस्येतही वाढ झाली आहे.

सतत कामामुळे डोळ्यांच्या सभोवती तयार झालेल्या या काळ्या वर्तुळांमुळे किंवा डार्क पिग्मेंटेशनमुळे लोक तथकलेले, डोळे सुजलेले, आजारी किंवा त्यांना झोप मिळाली नसल्याचे वाटते. जे पाहायला देखील अनाकर्षक वाटते. आता शाळा, अभ्यास, ऑनलाईन क्लासेस यामुळे स्क्रीन टाईमला आपल्या इच्छेनुसार कमी किंवा जास्त करणे प्रत्येकाला शक्य नाही आहे, पण डोळ्यांची थोडी काळजी घेतल्यास डार्क सर्कल्स नक्कीच कमी करता येऊ शकतात.

डार्क सर्कल का होतात?

डोळ्यांजवळ डार्क सर्कल हे बहुतांश आपल्या डोळ्यांच्या भोवती एक गोलाकार स्नायू ऑर्बिक्युलिस ओकुलीच्या खाली डार्क मरून रंगाचे प्रतिबिंब बनणे म्हणजेच, पिग्मेंटेशनमुळे तयार होते. डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा खूप पातळ असते, ज्यामुळे ऑर्बिक्युलिस ओकुलीमध्ये पिग्मेंटेशन वरील त्वचेवरही दिसून येते. या व्यतिरिक्त मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनमधून निघणारा प्रकाश देखील डोळ्यांच्या भोवतालच्या त्वचेच्या आर्द्रतेवर परिणाम करते, ज्यामुळे डोळे सुजलेले, कोरडे आणि गडद रंगाचे दिसू लागतात. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांच्या सल्ल्यावरून आम्ही तुमच्याबरोबर काही टीप्स शेअर करणार आहोत ज्या डार्क सर्कल्स कमी करण्यात फायदेशीर ठरू शकतात.

इंदौरच्या सौंदर्य आणि मेकअप तज्ज्ञ सविता शर्मा यांनी सांगितले की, कोरोना काळापासून ते आतापर्यंत त्यांच्याकडे या समस्येनेग्रस्त अनेक महिलांचे फोन कॉल आलेत किंवा त्या स्वत: त्यांच्या सलूनमध्ये आल्या. आता कार्यालये उघत असल्याने अशात डोळ्यांच्या आजूबाजूला आलेले डार्क सर्कल्स त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि आत्मविश्वासावर परिणाम करत आहेत. नैसर्गिकरित्या मेकअप न करता काळ्या वर्तुळांपासून (dark circles) कसा सुटका मिळेल, हाच सर्वांचा प्रश्न असतो.

कसे मिळेल समाधान?

सविता शर्मा सांगतात की, योग्य काळजी आणि पोष्टिक आहाराच्या मदतीने या समस्येपासून सुटका मिळू शकते. सविता सांगतात की, या समस्येने ग्रस्त लोकांनी आपल्या आहारात विशेषत: व्हिटामिन सी आणि ई सह सर्व पोषणयुक्त आहाराचा समावेश केला पाहिजे. या व्यतिरिक्त योग आणि चेहऱ्याची मालिश केल्यानेही डार्क सर्कलच्या समस्येमध्ये फायदा मिळू शकतो.

डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी काही नियम आपल्या दिनक्रमात समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते जसे,

- झोप पूर्ण केल्याने डार्क सर्कल्स कमी होऊ शकतात.

- डिजिटल उपकरणांचा वापर करताना वारंवार ब्रेक घ्या.

- आपले डोळे स्क्रीनपासून हाताच्या अंतरावर असावे.

- झोपण्याच्या 40 मिनिटांअगोदर डोळ्यांखाली क्रीम लावा आणि हलक्या हातांनी मालिश करा.

- ग्रीन टीचे थंड टी - बॅग, बटाट्याचे लच्छे आणि गुलाब जलमध्ये भिजवलेली रूई बंद डोळ्यांवर ठेवल्याने रक्त वाहिन्यांचा ताण कमी करण्यास मदत होते. याने काळी वर्तुळे कमी होतील, डोळ्यांमध्ये ताजेपणा येईल आणि त्यांना आराम देखील मिळेल.

- डोळ्यांना बंद करून त्यांच्या आजूबाजूची त्वचा आणि आई ब्रोवर बोटांनी सतत हालवून पॅटिंग करा.

- डॉक्टरांच्या सल्ल्यावर डोळ्यांना आराम देणाऱ्या आईड्रॉपचा वापर देखील डोळ्यांना थंडावा देऊ शकते.

सविता शर्मा सांगतात की, थोडीशी काळजी आणि लक्ष दिल्याने केवळ डार्क सर्कलच नव्हे तर, डोळ्यांचा थकवा यासारख्या इतर समस्येपासून देखील आराम मिळू शकतो.

हेही वाचा -'ही' भाजी पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी करू शकते, संशोधनातून समोर..

ABOUT THE AUTHOR

...view details