महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Fashion Tips : अरे बापरे! या चुकीच्या पद्धतीमुळे फाटू शकते साडी; जाणून घ्या, साडी पिन परफेक्ट कशी लावायची? - Fashion Tips

साडी (saree) म्हटलं की महिलांचा सॉफ्ट कॉर्नर असतो. स्त्रीचे रूप खुलते ते साडीमध्ये (Women's looks beautiful in saree) अशी एक मान्यता आहे. महिलांनासुद्धा साडी नेसणे फार आवडते. पण साडी सांभाळणे तिची काळजी घेणे ही तेवढेच आव्हानात्मक असते. बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीमुळे साडी फाटू शकते. चला तर मग जाणून घेऊयात साडी पिन परफेक्ट कशी लावायची.

how to pin saree perfectly
साडी पिन परफेक्ट कशी लावायची?

By

Published : Oct 23, 2022, 3:18 PM IST

सणावाराचे दिवस आले की पटापट कपाटातून महागड्या साड्या, महागडे ड्रेस बाहेर काढतो. महागड्या साड्यांचे नाजूक पदर आणि भरजरी ओढण्या सांभाळताना अनेकींना नाकी नऊ येतात. कारण साडी किंवा ओढणी जेवढी महागडी तेवढा तिच्यात अधिक जीव असतो. म्हणूनच तर ती आपण अगदी जपून वापरतो.

जेव्हा साडी किंवा ओढणी जोरात ओढल्या जाते तेव्हा पदराचा किंवा ओढणीचा भाग पिनला (safety pin) असलेल्या गोलकार भागात अडकून बसतो. तिथून तो काढणं खूप अवघड असतं. कारण तो हमखास फाटतोच. कधी कधी मात्र पदर- ओढणी कुठेतरी अडकून खचकन ओढल्या जाते आणि पदराला किंवा ओढणीला ज्या जागी पिन लावलेली असते, त्याठिकाणी ती फाटते. असं होऊ नये, यासाठी डॉली जैन यांनी एक सोपा उपाय सांगितला आहे.

पिनमध्ये अडकून साडी किंवा ओढणी फाटण्याची भिती:महागड्या साड्यांच्या पदरांना किंवा भरजरी ओढण्यांना आपण बऱ्याचदा सांभाळत- घाबरत साडी पिन लावतो. कारण पदर किंवा ओढणी चुकून ओढल्या गेलीच तर ती फाटण्याची भिती असते.

ही सोपी पद्धत वापरा: साडीला आपण जी सेफ्टी पिन लावतो, त्या पिनेच्या खालच्या टोकाला एक गोलाकार भाग असतो. जेव्हा साडी किंवा ओढणी जोरात ओढल्या जाते तेव्हा पदराचा किंवा ओढणीचा भाग पिनला असलेल्या गोलकार भागात अडकून बसतो. आणि तिथून तो काढणं खूप अवघड असतं. त्यासाठी सेफ्टी पिन घ्या. त्या पिनमध्ये मणी घाला त्यानंतर ती पिन साडीला लावा. त्यामुळे साडी फाटण्याची भिती राहत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details