हैदराबाद:रक्ताशी संबंधित 'हिमोफिलिया बी' (Hemophilia B) या आरोग्याच्या समस्येवर जगातील सर्वात महागडे औषध उपलब्ध झाले आहे. त्याला एफडीएने (FDA) नुकतीच मान्यता दिली आहे. ऑस्ट्रेलियातील त्याची उत्पादक कंपनी 'सीएसएल लिमिटेड'ने (CSL Limited) औषधाची किंमत 35 लाख डॉलर्स निश्चित केली आहे. म्हणजे आपल्या चलनात रु. 28.6 कोटी. यामुळे हा जगातील सर्वात महागडा उपचार ठरतो. रक्त गोठण्याच्या समस्यांशी संबंधित दुर्मिळ विकारावर उपलब्ध असलेले हे पहिले अनुवांशिक उपचार आहे. (The most expensive medicine in the world to enter the market)
उपचार दीर्घकाळासाठी अधिक प्रभावी:दर 40 हजार लोकांपैकी एक व्यक्ती अशा आरोग्य समस्येने ग्रस्त आहे. यकृतामध्ये तयार होणारे प्रथिन फॅक्टर-9 च्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते. सध्या अनेक कंपन्यांकडून उपलब्ध असलेल्या उपचारांच्या तुलनेत सीएसएलद्वारे उपलब्ध करून दिलेले उपचार दीर्घकाळासाठी अधिक प्रभावी आहेत. नवीन उपलब्ध उपचारांमध्ये अनुवांशिकदृष्ट्या सुधारित विषाणूचा समावेश आहे, जो यकृतामध्ये एक अद्वितीय अनुवांशिक सामग्रीचा परिचय करून देतो. फॅक्टर-9 नंतर यकृतातून सोडले जाते.