महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Perimenopause : पेरीमेनोपॉजमुळे रजोनिवृत्तीच्या कालावधीत वजन होते कमी : संशोधन - female health tips

रजोनिवृत्तीमध्ये अनेकदा शरीराच्या रचनेत तीव्र प्रतिकूल बदल आणि ऑस्टिओपोरोसिस (osteoporosis ) आणि हृदयविकार ( heart disease ) या आजारांचा धोका वाढतो. रजोनिवृत्तीतील स्त्रियांचेही वजन वाढते. रजोनिवृत्तीच्या काळात वजन वाढू नये म्हणून काय काळजी घेणे गरजेचे आहे याबद्दल खालील टिप्स फॉलो करा.

Perimenopause
Perimenopause

By

Published : Mar 4, 2022, 12:47 PM IST

पेरीमेनोपॉज दरम्यान या समस्यांचे निराकारण करण्यासाठी चांगली जीवनशैली असणे गरजेचे आहे. द नॉर्थ अमेरिकन मेनोपॉज सोसायटी (North American Menopause Society) च्या जर्नलमध्ये रजोनिवृत्तीच्या संशोधन ऑनलाइन प्रकाशित झाले आहेत.

या संशोधनात रजोनिवृत्तीच्या प्रतिकूल लक्षणांवर जास्त लक्ष केंद्रित केले जाते. रजोनिवृत्तीपूर्वीच्या काळात जीवनाची गुणवत्ता, उत्पादकता आणि घनिष्टतेशी संबंधित घडणाऱ्या बदलाला पेरीमेनोपॉज म्हणतात. रजोनिवृत्तीमुळे चरबीचे प्रमाण वाढते. ओटीपोटावर चरबी दिसल्यास हे मोनोपॉज बदलाचे संक्रमण आहे. रजोनिवृत्तीमुळे हाडांचे नुकसान होऊ शकते.

रजोनिवृत्तीचे परिणाम

वयानुसार विश्रांती आणि व्यायामादरम्यान ऊर्जा कमी होते. संशोधकांनी रजोनिवृत्तीच्या सर्व टप्प्यांवर (प्रीमेनोपॉज, पेरीमेनोपॉज आणि पोस्टमेनोपॉज) महिलांचे शरीर रचनेची विश्रांती आणि व्यायाम चयापचयातील बदल समजून घेतले. शरीराची रचना आणि आहाराच्या सवयी, शारीरिक निष्क्रियता आणि झोप यासारख्या निवडक जीवनशैलीतील घटकांमधील संबंध ओळखणे हे उद्दिष्ट होते.

पेरामॉनोपॉज

पेरामॉनोपॉज ही जीवनशैलीतील हस्तक्षेपासाठी सर्वात योग्य गोष्ट असते. चरबीची वाढलेली टक्केवारी, कमी दुबळे शरीर आणि मध्यवर्ती लठ्ठपणाकडे वळले आहे. प्रीमेनोपॉज आणि पेरिमेनोपॉज कालावधी दरम्यान चरबीच्या एकूण टक्केवारीतील सर्वात मोठे बदल दिसतात. रजोनिवृत्तीनंतर बदल स्थिर होतात. व्यायामाच्या चयापचयातील मोठे फरक या कालावधीत आढळून आले. पेरीमेनोपॉज आणि पोस्टमेनोपॉज गटांमध्ये सरासरी शारीरिक क्रिया नोंदवल्या गेल्या.

रजोनिवृत्तीचे चयापचय प्रभाव:

शरीर रचना आणि व्यायाम चयापचय संबंधित लेखात अभ्यासाचे परिणाम सांगतिले आहे. "हा अभ्यास रजोनिवृत्तीच्या संक्रमणादरम्यान शरीर रचना आणि चयापचय बदल सांगतो. रजोनिवृत्तीशी संबंधित हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम वाढण्यास हातभार लागतो. निरोगी जीवनशैलीमुळे शरीराच्या रचना आणि चयापचयातील बदल अभ्यासण्यासाठी अतिरिक्त संशोधन आवश्यक आहे,” डॉ. स्टेफनी फॉबियन, NAMS वैद्यकीय संचालक म्हणतात.

हेही वाचा -World Hearing Day 2022 : श्रवणदोष कमी करण्यासाठी 'हे' उपाय योजा

ABOUT THE AUTHOR

...view details