महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Teens Suffer Back Pain : दिवसातून तीन तास मोबाईल वापरणाऱ्या किशोरवयीन मुलांना होतो पाठदुखीचा त्रास - मूल

सतत मोबाईल पाहत बसलेल्या मुलांमध्ये विविध आजार बळावत असल्याच्या घटना स्पष्ट होत आहेत. मात्र दिवसातून तीन तास मोबाईल वापरल्यास किशोरवयीन मुलांना पाठदुखीचा त्रास होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

Teens Suffer Back Pain
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 8, 2023, 2:57 PM IST

वॉशिंग्टन : सध्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन वापराचे फॅड आलेले आहे. मात्र तीन तास मोबाईल वापरणाऱ्या मुलांना पाठदुखीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे ब्राझीलच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपले मूल जर मोबाईल फोनचा अतिवापर करत असेल तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या मुलाला विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो, असेही या संशोधनातून पुढे आले आहे.

पाठदुखीचा होतो त्रास :ब्राझीलच्या संशोधकांनी केलेले हे संशोधन थोरॅसिक स्पाइन वेदना (TSP) वर केंद्रित होते. पाठीचा कणा मानेच्या तळापासून कमरेच्या मणक्याच्या सुरुवातीपर्यंत पसरलेला असतो. मात्र मोबाईल पाहत बसल्याने त्याला मोठा त्रासाचा सामना करावा लागू शकतो. साओ पाउलोतील बौरू येथील हायस्कूलच्या 14 ते 18 वयोगटातील मुले आणि मुलींच्या सर्वेक्षणातून या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. हे संशोधन हेल्थकेअर या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. दिवसातून तीन तासांपेक्षा जास्त मोबाईल स्क्रीन पाहणे, डोळ्यांचे स्क्रीनच्या जवळ असणे आणि पोटावर बसणे किंवा पडण्यामुळे पाठीचा त्रास होऊ शकतो.

मुलांपेक्षा मुलींना अधिक त्रास :किशोरवयीन मुलांमध्ये मोबाईल वापराचे अनेक दुष्परिणाम आढळून आले आहेत. संशोधकांनी केलेल्या या संशोधनात मार्च ते जून 2017 मध्ये 1 हजार 628 सहभागींना आधारभूत प्रश्नावली देण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 393 जणांनी 2018 मध्ये फॉलो अप प्रश्नावली पूर्ण केली होती. या विश्लेषणाने 38.4 टक्के एक वर्षात झालेला परिणाम दर्शविला. आणि 10.1 टक्केच्या एका वर्षाच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र संशोधकांनी केलेल्या या संशोधनात मुलांपेक्षा जास्त मुलींना जास्त त्रास असल्याचे नोंदवले आहे.

कोरोनामुळे झाली वाढ :जगभरातील लोकसंख्येच्या वेगवेगळ्या वयोगटांमध्ये पाठदुखीचा त्रास सामान्य आहे. त्याचा प्रसार प्रौढांमध्ये 15-35 टक्के आणि किशोरवयीन मुलांमध्ये 13-35 टक्के आहे. कोविड-19 महामारीच्या काळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरात झालेल्या स्फोटक वाढीमुळे ही समस्या अधिकच बिकट झाली आहे. पाठदुखीचा त्रास हा शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीशी संबंधित असल्याचे अनेक तपासण्यांनंतर स्पष्ट झाले आहे. पाठीच्या आरोग्यावर शारीरिक हालचाली, बैठकीची सवय आणि मानसिक विकार यांच्या प्रभावाचे भक्कम पुरावे देखील आढळून आल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. अभ्यासाचा उपयोग शालेय विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांसाठी आरोग्य शिक्षण कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी केला जाऊ शकत असल्याचे या संशोधनाचे संशोधक अल्बर्टो डी विट्टा यांनी स्पष्ट केले. त्यांनी स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्पिनास (UNICAMP) मधून पीएचडी पूर्ण केली आहे.

हेही वाचा - Ayurveda For Treating Long Covid : दीर्घ कोरोना लक्षणांच्या रुग्णांसाठी आयुर्वेदिक उपचार प्रभावी

ABOUT THE AUTHOR

...view details