मुंबई :मुंबई सह राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्यात उष्माघाताचा त्रास अनेक नागरिकांना झाल्याचे समोर आले आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर लोकल असो किंवा बेस्टची बस मधील प्रवास करणाऱ्यांची हालत तर विचार करण्याच्या पलीकडे आहे. हातातील रुमालाने घामांच्या धारा टिपताना सगळीकडे पाहायला मिळत आहे. वाढलेल्या उकाडामुळे त्वचा संदर्भातील रोगांनी डोकं वर काढला आहे. त्वचारोग असलेल्या रुग्णांमध्ये 30 टक्क्याने वाढ झाली आहे. आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी जाणून घेऊया.
त्वचेवरील लक्षणे :मुंबईत मधील उष्ण, दमट वातावरणामुळे खाज येत असते. त्यानंतर पुरळ देखील उठल्याचे प्रमाण वाढत आहे.पूर्ण कपडे परिधान केले असतांना झाकलेल्या ठिकाणी गुलाबी रंगाचे दाणेदार चट्टे दिसू लागतात. काखेत ,मांडीच्या सांध्यात बुरशीजन्य संसर्ग चट्ट्यानां तीव्र प्रकारची खाज येत असते.
काय उपाय करावा : चट्ट्यांवर वर्णावर येणारी खाजेवर उपाय म्हणून सैल कपडे परिधान करावे . भरपूर पाणी प्यावे . उन्हाळ्यातील या पुरळांवर कॅलामाइन लोशनचा वापर केल्यास खाज किंवा अस्वस्थता कमी होण्यास मदत होते . ज्यांना सतत घाम येत असले अशा लोकांनी दिवसातून साध्या पाण्याने दोन वेळा अंघोळ करावी . नाहीतर ओल्या कपड्याने शरीर पुसावे . डस्टिंग पावडरचा नियमित वापर केल्यास फायदा होतो .
उन्हाळ्यात त्वचेचे रोग वाढतात :उन्हाळ्यात त्वचेच्या रोगांचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे आपण त्वचेची काळजी घेतली पाहिजे. स्वतःला हायड्रेट करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर राजेंद्र तासकर यांनी माहिती त्यांनी म्हटले आहे की उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. विटामिन सी असलेल्या फळांच्या रसाचे सेवन करा. लिंबू संत्रे, मोसंबी आवळा फळांचा रस घ्यावा. संस्क्रीन लोशन चा वापर करावा जास्त मेकअप करायचे. ड्राय स्किन पिगमेंटेशन अशावेळी जास्त त्रास जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांनाकडून तपासणी करावी असे आवाहन डॉ राज तासकर यांनी केले आहे.
हेही वाचा :
- Strong sunlight : कडक उन्हामुळे त्वचेला पोहोचवू शकते हानी; घ्या अशी काळजी
- Health Tips : गरम पाण्याने अंघोळ केली तर होतात हे फायदे.. मधुमेहही होतो दूर...
- Boiled Rice : उकडलेले तांदूळ फक्त मजबूत केसांसाठीच नाही तर इतर अनेक आजारांवर देखील फायदेशीर...