हैदराबाद :वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिलला दिसणार आहे. या सूर्यग्रहणाचा कोणत्या राशीवर काय परिणाम होईल, याबाबतची माहिती आम्ही ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
मेष : सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. बिझनेस पार्टनरशी संभाषणातही काळजी घ्या. या दरम्यान तुमच्यामध्ये अहंकार वाढू शकतो. उपाय - भगवान शंकराचा जलाभिषेक करावा.
वृषभ : सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांनी घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये. सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता. काळजी घ्या उपाय - भगवान सूर्याला जल अर्पण करा.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नावरही परिणाम होईल. मित्रांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. उपाय- भगवान विष्णूची पूजा करा.
कर्क : सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी घाईत कोणताही निर्णय घेणे हानिकारक ठरू शकते. व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये काही अडचण येऊ शकते. उपाय - शिवाचा जलाभिषेक करावा.
सिंह : सूर्यग्रहणामुळे नशीब साथ देत नाही असे तुम्हाला वाटेल. या काळात तुम्ही प्रवास करत असाल तर काळजी घ्यावी. परिश्रमाचे फळ जेवढे मिळायला हवे तेवढे मिळणार नाही. उपाय- गायत्री चालिसाचा पाठ करा.
कन्या : सूर्यग्रहणाच्या काळात अपघात होण्याची शक्यता आहे. वाहने इत्यादींचा वापर जपून करावा. तुम्ही सध्या कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीत हात आजमावू नका. उपाय - विष्णु सहस्रनामाचा पाठ करा.