हैदराबाद :सूर्य ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना असली तरी, ज्योतिषशास्त्रातही ग्रहणाला खूप महत्वाचे मानण्यात येते. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे ज्योतिषशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. 20 एप्रिलला या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सकाळी दिसणार आहे. तर दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबरला दिसणार आहे. त्यामुळे जाणून घेऊ सूर्यग्रहणाची वेळ, सुतक काळ आणि या ग्रहणाचा काय अर्थ आहे, याविषयीची सविस्तर माहिती.
किती असेल सूर्यग्रहणाचा सुतक काळ :सूर्यग्रहणात काही महत्वाची कामे करण्यात येऊ नये, असे ज्योतिषशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रहणात कोणकोणत्या गोष्टी वर्ज्य करण्यात आल्या आहेत, सूर्यग्रहणात कोणत्या गोष्टी करण्यास मनाई करण्यात आल्या आहेत, त्याबाबतची माहिती जाणून घेण्याविषयी सगळ्यांना उत्सुकता असते. त्यासह ग्रहणाचा प्रभाव आणि सुतक कालावधी किती असतो, याबाबतही नागरिकांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. सकाळी 7:04 वाजता या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुरू होणार असून ते सूर्यग्रहण दुपारी 12:29 वाजता संपणार असल्याची माहिती ज्योतिषशास्त्रज्ञांनी दिली आहे. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी किंवा सुतक कालावधी 5 तास 24 मिनिटे असणार आहे. त्यामुळे या पाच तासात नागरिकांना सूर्यग्रहण पाहण्यास मिळणार आहे.