महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Sun In Aries : सूर्यदेव करणार संक्रमण, जाणून घ्या कोणत्या सात राशीवर होणार धनाचा वर्षाव, कोणत्या राशीला बसेल फटका - सूर्य

सूर्य शुक्रवारी 14 एप्रिल ते 15 मे 2023 या दरम्यान मेष राशीत संक्रमण करणार असल्याने विविध राशींवर त्याचा परिणाम होत आहे. कोणत्या राशींवर सुर्याच्या संक्रमणाचा काय परिणाम होणार आहे, याबाबतची माहिती या खास लेखातून आम्ही देत आहोत.

Sun In Aries
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 14, 2023, 1:45 PM IST

मेष :वृष संक्रांतीपासून या राशीचे नागरिक काहीसे उत्साही राहणार आहेत. मात्र, या काळात तुमचा अहंकारही काहीसा वाढणार असून वृष संक्रातीपासून तुमचे वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. उजव्या डोळ्यातून पाणी येण्याची समस्या वाढून त्वचेची जळजळ होऊ शकते. उपाय : मेष संक्रांतीला दररोज भगवान सूर्याला जल अर्पण करा.


वृषभ :जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करेल, तेव्हा तुमच्या जीवनात बरेच बदल होतील. परदेशाशी संबंधित कामातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या प्रगतीचे मार्ग घरापासून खुले होतील. या दरम्यान तुम्हाला शत्रू पक्षाकडून फायदा होईल. कोणत्याही आजारात आराम मिळून जर तुम्ही या कालावधीत कर्जासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला ते मिळू शकते. उपाय : दररोज वडिलांचा आशीर्वाद घ्या.


मिथुन : वृष संक्रांतीचा एक महिना तुमच्यासाठी चांगला राहील. या काळात तुमचे नेटवर्किंग वाढून समाजात तुम्हाला मानसन्मान मिळेल. सरकारी काम करणाऱ्या लोकांशी तुमचे संबंध वाढतील. उपाय : दररोज भगवान शंकराचा आशीर्वाद घ्या.


कर्क : सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा कर्क राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा मार्ग खुला होतो. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला तुमच्या कामात फायदा होऊन तुम्ही सरकारी क्षेत्राशी संबंधित कोणतेही काम करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. उपाय : गायत्री मंत्राचा जप करा.


सिंह : वृष संक्रांतीच्या एका महिन्यापर्यंत सिंह राशीला सामान्य फळे मिळतील. या दरम्यान तुमचा आत्मविश्वास वाढून तुमच्या प्रवासात यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या काळात तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागून नशिबाऐवजी कठोर परिश्रमावर अवलंबून राहावे. उपाय : आदित्य हृदय स्तोत्राचा पठण करा.


कन्या : या राशीच्या लोकांनी सूर्य मेष राशीत प्रवेश करताना काळजी घ्यावी. या दरम्यान, काळजीपूर्वक वाहन चालवा आणि इलेक्ट्रिक वाहने जपून वापरा. सासरच्यांशी मतभेद होण्याचीही शक्यता राहील. संक्रमणाच्या महिन्यात कोणतीही नवीन गुंतवणूक करू नका. उपाय : मेष संक्रांतीच्या काळात दररोज गायत्री मंत्राचा जप केल्याने फायदा होईल.


तूळ : मेष राशीत सूर्याच्या आगमनामुळे तूळ राशीच्या लोकांचे जीवनसाथी किंवा व्यावसायिक जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. या दरम्यान तुम्ही अहंकारीही राहाल आणि इतरांच्या मतांकडे लक्ष देणार नाही. जर तुम्हाला चांगला वेळ घालवायचा असेल तर तुम्हाला इतरांचे ऐकण्याची सवय लावून घेतली पाहिजे. उपाय : मेष संक्रांतीच्या काळात भगवान शंकराचा जलाभिषेक रोज करावा.


वृश्चिक : मेष संक्रांतीच्या एका महिन्याचा काळ तुमच्यासाठी लाभदायक असल्याने तुम्हाला फायदा होईल. शत्रूंवर विजय मिळून जुने आजारही दूर होतील. तथापि, जर तुम्ही एखाद्याकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर आता प्रतीक्षा करा. उपाय : रोज सूर्यनमस्कार करा.


धनु : या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी सूर्याचे मेष राशीत प्रवेश करणे शुभ राहणार असून अभ्यासात प्रगती होईल. त्याचवेळी समाजात तुमचा दर्जा वाढेल, परंतु प्रेम जीवनासाठी हा काळ विसंगत असू शकतो. उपाय : मेष संक्रातीच्या काळात सूर्यदेवाला रोज जल अर्पण करा.


मकर : संक्रांतीच्या एका महिन्याचा काळ तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. आईची तब्येत ठीक असेल, पण तरीही तुम्ही तिची काळजी करत रहाल. यावेळी नवीन वाहन वापरू नका. जमिनीशी संबंधित कामात सावधगिरी बाळगा. उपाय : सूर्याष्टक पठण करा.


कुंभ : या संक्रातीपासून एक महिन्याचा कालावधी तुमचा आत्मविश्वास वाढवेल. तुम्हाला बहिणींचे सहकार्य मिळेल, परंतु कामाच्या ठिकाणी तुमची कोंडी होऊ शकते. या दरम्यान नशिबावर अवलंबून राहणे आपल्यासाठी हानिकारक असेल. उपाय : गहू गरजूंना दान करा.



मीन : सूर्य मेष राशीत प्रवेश करतो, तेव्हा मीन राशीच्या लोकांना त्यांच्या बोलण्यात कठोरपणा दिसेल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद वाढू शकतात. या काळात गुंतवणूकही हानिकारक ठरू शकते. वाहन जपून वापरा. उपाय : मेष संक्रातीच्या कुंकुम पाण्यात मिसळून भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.

हेही वाचा - Bihu Festival 2023 : का साजरा करण्यात येतो बिहू; काय आहे परंपरा, जाणून घ्या सविस्तर माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details