हैदराबाद - निसर्गात तुम्हाला उत्तम आरोग्य देण्याची शक्ती दडली आहे. 'सुखीभव वेलनेस' निसर्गाची हीच उर्जा घेऊन तुम्हाला चांगले आरोग्य, तारुण्य आणि परिवर्तन देतात. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 'सुखीभव वेलनेस'अंतर्गत तुम्हाला औषधविरहित, पारंपरिक उपचार पद्धती मिळतात. ज्यामुळे तुमचे शरीर, मन आणि आत्मा संतुलित राहण्यास मदत होते. सुखभवच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल संचालक डॉ. अर्चना ममगाईन म्हणतात, ‘या उपचार पद्धतीचे वेगळेपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शरीरे आणि आजार लक्षात घेऊन नैसर्गिक पद्धतीने उपचार ठरवले गेले आहेत.’
जीवनशैलीने परिपूर्ण पद्धती -
डॉ. अर्चना ममगाईन सांगतात की, सुखीभव वेलनेस फक्त तुम्हाला उपचार पद्धती देत नाही, तर तुमच्या शरीरातून नको असलेले घटकही काढून टाकते. त्यामुळे व्यक्तीला नवी उर्जा आणि गती मिळते. या उपचारांचा पूर्णपणे फायदाही मिळतो. यासाठी व्यक्तीचे शरीर समजून घेऊन आणि त्याची किंवा तिची समस्या लक्षात घेऊन उपचार पद्धती ठरवली जाते. अनेक उपचार पद्धती, आहार योजना आणि खास योगाचे व्यायाम तुमच्या गरजेनुसार ठरवले जातात. पचनाची समस्या, तणाव, निद्रानाश त्याचबरोबर सौंदर्य समस्यांवर नैसर्गिक आणि पारंपरिक उपचार दिले जातात. यामुळे मन, शरीर आणि मेंदू यातील संतुलन चांगले राखले जाते. उपचार पद्धतीचा कालावधी समस्येच्या स्वरूपावरून ठरवला जातो. असे म्हणतात की, तुम्ही काय आहार घेता याचे प्रतिबिंब तुमच्या मनात दिसते, म्हणूनच उपचारादरम्यान ठराविक आहारही सांगितला जातो. या उपचारादरम्यान विशेष आहाराचे पालन करणे अनिवार्य आहे.
परिपूर्ण व्यवस्थापन कार्यक्रम -
सुखीभव वेलनेसमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी परिपूर्ण व्यवस्थापन कार्यक्रम आखला जातो. आमचे तज्ज्ञ सांगतात की, सुखीभव वेलनेसमध्ये अनेक उपचार पद्धतींच्या मदतीने तुम्ही अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांतून बरे होऊ शकता.
मनतृप्ती: ताणतणाव व्यवस्थापन -
यात नैसर्गिक उपचार पद्धती आणि योग क्रियांचा वापर शरीरातून तणाव नाहीसा करण्यासाठी केला जातो. शरीर, मन आणि आत्मा यांना नैसर्गिक लयीत पुन्हा एकदा आणले जाते. यामध्ये आरोग्यदायी जीवनशैली, कमीत कमी तणाव, सकारात्मक बदल घडवणे आणि आयुष्याचा ताळमेळ राखणे यावरच लक्ष केंद्रित केले जाते.
सुनिद्रा: चांगली झोप येण्यासाठी -
यामध्ये पारंपरिक आयुर्वेदिक उपचार आणि निसर्गोपचार केले जातात. या उपचार पद्धतीत निसर्गोपचारविषयक सल्लामसलत, हर्बल आणि पोषक उपाय, हायड्रोरोमॅटिक विसर्जन आणि बरेच काही समाविष्ट आहे. या उपचार पद्धतीत तणाव, शरीराचे असंतुलन यामुळे झोपेवर झालेल्या विपरीत परिणामांवर लक्ष दिले जाते.
संजीवनी: वेदना व्यवस्थापन पद्धती -
शरीराला वेदनामुक्त करण्यासाठी संजीवनी पद्धतीत नैसर्गिक उपचार आणि योग क्रियांचा वापर केला जातो. यामुळे तुम्हाला उत्साही, ताजेतवाने आणि संतुलित वाटू लागते. आहार व्यवस्थापन हेसुद्धा या उपचार पद्धतीचा महत्त्वाचा भाग आहे. या उपचार पद्धतीमुळे तुमची वेदना कमी होते, शरीरात स्निग्धता वाढते, मान लवचिक होते आणि शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात.
समामकरोती: सुसंवाद पद्धती -
यात पारंपरिक आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचार पद्धतीचा वापर केला जातो. ही पद्धत शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक कल्याणाच्या उद्देश्याने तयार केली आहे. यात विश्रांती आणि शांततेसाठी सर्व उर्जा वापरली जाते. यामुळे शरीरातील अशुद्धी निघून जाते, झोपेत सुधारणा होते.
लावण्य: सौंदर्य उपचार पद्धती -