महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

तोंड, ओठ आणि दातांच्या रोगाने ग्रस्त आहात? मग करा हे घरगुती उपाय - दात हलणे

तोंड, ओठ व दातांची निगा व स्वच्छता राखणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराचे ते प्रवेशद्वार आहे. तोंड, दात, जीभ, ओठ यांचा दैनंदिन जीवनाशी संबंध आहे. यावर काही घरगुती उपाय खाली दिलेले आहेत.

तोंड, ओठ आणि दातांच्या रोगाने ग्रस्त आहात
Suffering from diseases of the mouth lips and teeth Then do this home remedy

By

Published : Oct 27, 2022, 10:03 AM IST

तोंड, ओठ आणि दातांचे रोग ह्या वर घरगुती उपाय:

तोंडातले छाले/तोंड येणे:तोंडात छाले झाल्यास ज्येष्ठमधाची काडी चघळावी. 'ब' जीवनसत्त्वाच्या अभावाने काही जणांना तोंड येते. जिभेचा किंवा इतर भाग लाल होतो आणि तिथे झोंबते. कथ्या बरोबर पेरुची पाने चावल्याने छाले बरे होतात. जीभेवर छाले झाल्यास एक केळे गाईच्या दुधा बरोबर खावे. काहीं दिवस घेतल्यास छाले बरे होतात.

दात दुखणे:लिंबाचा पाला घेऊन त्याचा रस ज्या बाजूची दाढ दुखत असेल त्या बाजूच्या कानात दोन थेंब टाकावे. लगेच आराम मिळतो. दात दुखल्यास थोडासा कापूर दुखणाऱ्या दाताखाली ठेवून दाबावे. दाढेत खड्डा असेल तर त्यात भरून द्यावे. वेदना बंद होतील. दात दुखी असल्यास कच्चा पपई चे दुध, थोडेसे हिंग आणि कापूर मिसळून कापसाच्या बोळ्याने दुखऱ्या दातात ठेवून दाबावे. दातदुखीच्या त्रासामुळे त्यांना अन्न चावून खाण्यास त्रास होतो. या मुळे त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही. तसेच, कधीकधी हिरड्या सैल होऊन इतर त्रास वाढण्याचेही प्रमाण आहे.

हिरडयांतुन रक्त येणे:गाजर, सफरचंद, आवळा यासारखी फळे खावीत. मीठ, हळद, आणि तुरटी समप्रमाणात घेऊन त्यांचे चूर्ण करून घ्यावे. या चूर्णाने मंजन करावे फार गरम किंवा फार थंड पेय घेऊ नये. दात हलणे: तिळाच्या तेलात काळे मीठ वाटून हिरड्यांवर चोळल्याने दात हलायचे बंद होतात.

दात दुखणे:लिंबाचा पाला घेऊन त्याचा रस ज्या बाजूची दाढ दुखत असेल त्या बाजूच्या कानात दोन थेंब टाकावे. लगेच आराम मिळतो. दात दुखल्यास थोडासा कापूर दुखणाऱ्या दाताखाली ठेवून दाबावे. दाढेत खड्डा असेल तर त्यात भरून द्यावे. वेदना बंद होतील. दात दुखी असल्यास कच्चा पपई चे दुध, थोडेसे हिंग आणि कापूर मिसळून कापसाच्या बोळ्याने दुखऱ्या दातात ठेवून दाबावे.

तोंडातली चव जाणे:तोंडात कडवटपणा असल्यास असेल तर डाळिंबाची साल पाण्यात उकळावे व त्यात थोडी बडीशेप टाकून चुळा भराव्यात. एक लिंबू कापून त्याच्या अर्ध्या फोडीत दोन चिमूट काळे मीठ व मिरपूड शिंपडून लिंबाला आगीत थोडे गरम करावे. नंतर तो लिंबू चोखल्याने जिभेचा कडवतपणा जाऊन जिभेला चव येते व अपचन आणि गॅसेस पण बरे होतात.

तोंडात किंवा श्वासात दुर्गंधी:जेवण झाल्यानंतर दोन्ही वेळा चमचाभर बडीशेप चघळल्याने तोंडाचा वास काही दिवसात जातो आणि पाचन क्रिया पण सुधारते. एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून त्या पाण्याने रोज सकाळी चुळा भरल्यास, तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.जेवणानंतर एक लवंग किंवा वेलची चघळल्याने तोंडाचा वास जातो. तुळशीची चार पाने रोज खाऊन वरून पाणी प्यायल्याने तोंडाचा वास जातो. जिरे भाजून खाल्ल्याने तोंडाचा घाण वास जातो. डाळिंबाच्या सालीचे चूर्ण 4 ग्राम घेऊन फक्की मारावी व पाणी प्यावे. साल उकळून त्या पाण्याने चूळा भरल्याने सुद्धा तोंडाची दुर्गंधी जाते. धने खाल्याने तोंडात सुवास येतो. जेवण झाल्यावर थोडे धने अवश्य खाल्ले पाहिजे. एक चमचा आल्याचा रस 1 ग्लास गरम पाण्यात टाकून त्याने चूळ भरल्यास तोंडाचा घाण वास जातो.

पायरिया:लिंबाची फांदी पानासकट सावलीत वाळवावी आणि जाळून बारीक वाटून घ्यावी. त्यात काही लवंग, पिपरमेंट आणि मीठ मिसळावे. सकाळ-सायंकाळ या चूर्णाने मंजन केल्याने पायरिया बरा होतो. आंब्याच्या कॊयीचा गराचे बारीक चूर्ण करून त्याचे मंजन केल्याने पायरिया बरा होतो.

ABOUT THE AUTHOR

...view details