एचआयव्ही आणि हेपटायटिस आईमुळे तिच्या होणाऱया बाळाला संसर्ग होऊ शकतो. मात्र, कोरोनाचा संक्रमण आईद्वारे बाळाला होत नाही. जवळपास 250 कोरोनाबाधित महिलांनी स्वस्थ आणि कोरोना निगेटिव्ह बाळाला जन्म दिला आहे. हा एक सकारात्मक विकास असल्याचे आगरतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख तमन मजूमदार यांनी सांगितले.
एचआयव्ही आणि हेपटायटिस बाधित आईमुळे तिच्या होणाऱ्या बाळाला याचा संसर्ग होऊ शकतो. मात्र, कोरोनाचे तसे नाही. कोरोनाचा जन्मजात प्रसार होत नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 214 तर दुसऱ्या लाटेत 35 कोरोनाबाधित महिलांनी सामान्य बाळांना जन्म दिला, असे आगरतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागाचे प्रमुख जयंत रे यांनी सांगितले.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सर्व गर्भवती महिलांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच नवजात बाळांच्या कुटुंबीयांनी खबरदारी बाळगायला हवी. त्यांनी बाळाच्या संपर्कात येऊ नये, असेही जयंत रे यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मिझारोम, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय आणि आसाममध्ये 15 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना कोरोनाची बाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारांना बाल रोग विशेषज्ञांची समिती गठीत करावी लागत आहे, असे पूर्वेत्तर राज्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत युवक आणि लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच या लाटेत रुग्णांचा कोरोनामुक्त होण्याचा दर कमी आणि मृत्यू दर जास्त आहे. ब्रिटन आणि ब्राझिलमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनपेक्षा भारतात आढळलेला स्ट्रेन आधिक धोकादायक आहे. अदिवासी भागातील लोकांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे गंभीर अभ्यासाची गरज आहे, असे पूर्वेत्तर राज्य आणि बांगलादेशात कोरोनाव काम केलेल्या हेपटायटिस रोगाचे विशेषज्ञांनी सांगितले.