पावसाळ्यात त्वचेची चांगली काळजी घेणे खूप गरजेचे आहे. बर्कशायर युनायटेड किंगडम येथील त्वचा रोग तज्ज्ञ आणि सुरे स्किनकेयर बर्कशायरचे वैद्यकीय संचालक डॉ. संदीप सोएन सांगतात की, या मोसमात कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणामुळे संसर्ग आणि त्वचा रोग संबंधी समस्यांचा धोका वाढू शकतो.
डॉ. संदीप यांनी 'ईटीव्ही भारत सुखीभवला' सांगितले की, पावासाळ्यात वातावरणाचा त्वचेवर खूप जास्त प्रभाव पडू शकतो. त्याचबरोबर, या मोसमात मुले आणि मोठ्यांना विविध समस्या होऊ शकतात. सामान्यत: या मोसमात सगळ्यात जास्त त्रास देणाऱ्या समस्या पुढील प्रमाणे आहेत,
घामोळे
डॉ. संदीप सांगतात की, घामोळे हा एक सामान्य त्वचा रोग आहे, जो सामान्यत: अशा ठिकाणी होते जेथे ओलावा जास्त असतो आणि हवा सहज पोहचू शकत नाही आणि जेथे जास्त घाम येतो. घामोळ्यात त्वचेवर आलेले दाने खूप खाज निर्माण करू शकतात आणि बरेचदा त्यातून वेदनाही होऊ शकतात. इतकेच नव्हे तर, समस्या जास्त झाल्यावर कधीकधी दान्यांच्या ठिकाणी सौम्य फोडे देखील येऊ शकतात. मात्र, थोडी काळजी घेतल्यास ही समस्या टाळता येऊ शकते. बहुतांश प्रकरणांमध्ये याच्या उपचारासाठी वैद्यकीय मदतीची गरज पडत नाही.
घामोळ्यांपासून बचावासाठी सर्वात चांगला उपाय शरीराला ठंड ठेवणे आणि ढिले सोडणे हा आहे. शक्य असल्यास सुती कपडे घालावे. घामोळ्या झाल्यावर दान्यांवर कॅलामाईन लोशन आणि खाजेसाठी अँटीहिस्टामाईनचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, घामोळ्यांसोबत सूज असल्यास ती कमी करण्यासाठी स्टिरॉइड क्रीमचा वापर करावा लागू शकतो, अशी माहिती डॉ. संदीप यांनी दिली.
टिनिया क्रूरिस ( जॉक खाज - फंगल संसर्ग)
दमट वातावरणात ही समस्या देखील सामान्यत: लोकांना त्रास देऊ शकते. टिनिया संसर्ग किंवा जॉक खाज हा शरीराच्या कोणत्याही भागांत होऊ शकतो, मात्र तो कंबर आणि त्याचा आसपासच्या भागांत जास्त प्रमाणात होतो. हा संसर्ग हात, मान आणि स्तनांभोवती देखील होऊ शकतो. संसर्गाच्या सुरुवातील दाने आकाराने लहान असतात, मात्र हळू हळू त्यांचा आकार झपाट्याने वाढू शकतो आणि त्यांचे गजकर्णासारख्या (दाद) लाल आणि पपडीदार दान्यांमध्ये रुपांतरण होऊ शकते. ही समस्या झाल्यास सैल आणि हवादार कपडे घालण्यास प्राधान्य दिले पाहिजे. टिनियाच्या उपचारासाठी डॉक्टर अँटी फंगल क्रीम आणि टॅबलेटचा वापर करण्याचा सल्ला देतात, जे बाजारात सहज उपलब्ध असतात.
डास आणि इतर कीटकांच्या चाव्यामुळे होणारे त्वचा रोग