राखीचा सण हा बहीण-भावातील प्रेम आणि आणि सुरक्षेच्या आश्वासनाचा सन आहे. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला तिच्या सुरक्षेचे आश्वासन देतो, तसेच बहीण देखील आपल्या भावासाठी चांगल्यात चांगली सुंदर राखी निवडते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे यावेळी देखील बाजार विविध प्रकारच्या राखींनी सजले आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे बाजारात लोकांकडून होणाऱ्या खरेदीमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र विविध ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर यावेळी राखी खरेदीचा ट्रेंड वाढला आहे.
यंदा बहिणी फक्त बाजारातूनच नव्हे तर, ऑनलाइन शॉपिंग साईटवरून देखील राखी खरेदी करत आहेत. यंदा बहिणींना 'इव्हल आई' आणि 'रुद्राक्ष' राखी जास्त आवडत आहे. आता या पसंतीला कोरोनाची पार्श्वभूमी आहे की भावाच्या भरपूर आयुष्यासाठी बहिणीकडून केलेली प्रार्थना किंवा प्रयत्न, मात्र मोठ्या प्रमाणात बहिणी 'इव्हल आई' किंवा 'रुद्राक्ष राखी' आपल्या भावाला कोणत्याही दुष्ट नजरेपासून किंवा आजारापासून सुरक्षित ठेवेल आणि आपल्या गुणांनी आपल्या भावाचे आरोग्य निरोगी ठेवेल या आशेने या राखींकडे आकर्षित होत आहेत.
काय आहे इव्हल आई?
फेंगशुईनुसार इव्हल आई सौभाग्य आणि सुरक्षेचे प्रतिक मानले जाते, जे नकारात्मक आणि वाईट उर्जेला दूर ठवते. सामान्यत: ती अल्ट्रा मरीन ब्ल्यू ग्लास बीड्सने बनलेली असते, ज्यात एका डोळ्यासारखे डिजाईन असते ज्यांच्या आजूबाजूला अश्रूच्या थेंबाच्या आकारात रेषा असतात. लोकं घरी सकारात्मक वातावरण बनवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या 'इव्हल आई' ला घरी टांगतात. तसेच अनेक लोकं यापासून बनवलेल पेडेंट, ब्रेसलेट, ब्रोच आणि अंगठी देखील घालतात. यंदा बाजारात इव्हल आई राखींना खूप जास्त मागणी आहे.
रुद्राक्षाचे फायदे