रायपूर : शितला अष्टमीचा शूभ सण बुधवार १५ मार्चला देशभरात साजरा करण्यात येत आहे. या दिवशी जेष्ठ नक्षत्र, सिद्धी योग, बलव आणि कौलव करण हे शुभ योग दिसत आहेत. त्यामुळे आजपासूनच खरमास सुरू होणार आहे. या दिवशी स्वयंपाकघरात अन्न शिजवले जात नाही. या दिवशी अन्नपूर्णा मातेला विश्रांती दिली जाते. शीतला सप्तमी म्हणजेच 1 दिवस आधी तयार केलेले अन्न शीतला अष्ठमीच्या दिवशी खाण्यात येते. हा सण उत्तर भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.
शिळे अन्न खाण्याची आहे प्रथा : शीतला सप्तमीला तयार केलेले अन्न दुसऱ्या दिवशी शिळे 'बासा खाना' प्रसाद म्हणून खाल्ले जात असल्याची माहिती ज्योतिषी आणि वास्तुविशारद विनीत शर्मा यांनी दिली. शीतला सप्तमीच्या दिवशी घरात अन्न न बनवल्याने शीतला माता प्रसन्न होते, अशी नागरिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे लहान मुलांना कांजण्या, तीव्र ताप, गोवर आदी आजारांपासून शीतला माता मुलांचे रक्षण करते अशी नागरिकांची श्रद्धा आहे. हा सण म्हणजे शीतला मातेच्या पूजेचा विशेष सण आहे. या दिवशी कुटुंबातील सगळे जण आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत शीतला मातेचे दर्शन घेतात. यावेळी शीतला मातेला पिवळे कपडे, पिवळी फुले, चंदन, रोळी, कुंकू, गुलाल, परिमल तसेच विविध प्रकारचा सिंदूर शीतला मातेला लावला जातो, असेही शर्मा यांनी यावेळी सांगितले.