नवी दिल्ली : हिंदू धर्मात सणांसोबतच उपवासालाही विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत अत्यंत शुभ आणि फलदायी असल्याचे सांगितले आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला 'षटतिला एकादशी' असे म्हणतात. षटतिला एकादशीचे व्रत बुधवारी म्हणजेच 18 जानेवारी रोजी पाळण्यात येणार आहे.
षटतिला एकादशीमध्ये तिळाचे महत्त्व : षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व आहे. या एकादशीच्या दिवशी तिळाचा वापर 6 प्रकारे केला जातो. यामुळेच हिला षटतिला एकादशी असे म्हणतात. षटतिला एकादशीला तीळाने स्नान करावे, तीळ उकळवे, तिळाचे हवन व तर्पण करावे, अन्नात तीळ वापरावे आणि तिळाचे दान करावे अशी श्रद्धा आहे. धार्मिक मान्यतेनुसार षटतिला एकादशीचे व्रत केल्यास पापांचा नाश होतो. यासोबतच पृथ्वीवर सर्व सुखांची प्राप्ती होते.
हेही वाचा :Ramcharit Manas : रामायणातील चौपाईचा 'असा' करा जप, जाणून घ्या रामचरितमानस महाकाव्याबद्दल
षटतिला एकादशीचा शुभ मुहूर्त : षटतिला एकादशी सुरू होते -17 जानेवारी संध्याकाळी 6.20 वाजता, षटतिलाएकादशी संपते - 18 जानेवारीला दुपारी 4.18 वाजता, व्रत पारण -19 जानेवारी रोजी सकाळी 07.15 ते 09.29 पर्यंत केले जाईल.
हे चुकूनही करू नका :1) शास्त्रानुसार षटतिला एकादशीच्या दिवशी तामसी अन्नाचे सेवन करू नये. या दिवशी मांस, कांदा, लसूण यांचे सेवन करू नये. तसेच या दिवशी दारू, गुटखा, सिगारेट इत्यादी कोणत्याही प्रकारची नशा देखील टाळावी. 2) पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांती, अमावस्या, चतुर्दशी, पौर्णिमा आणि एकादशीच्या दिवशी शारिरिक संबंध जोडू नयेत. या दिवशी असे करणे हे पाप मानले जाते. 3) षटतिला एकादशीला दानाचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी घरी आलेल्या कोणत्याही साधू किंवा वृद्ध व्यक्तींना रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका. या दिवशी दान करावे. 4) षटतिला एकादशीचा उपवास करणारे भक्त या दिवशी झोपण्यासाठी खाट, पलंग इत्यादीचा वापर करू नका. जमिनीवर झोपा आणि विश्रांती घ्या.
या गोष्टींची विशेष काळजी घ्या :1) षटकतिला एकादशीचे उपवास करणाऱ्या भक्तांनी या दिवशी तीळाचे उटणे लावावे. 2) षटतिला एकादशीला पाण्यात तीळ टाकून स्नान करावे. 3) या दिवशी तिळाच्या तेलाने मसाज करावी. 4) षटतिला एकादशीला भगवान विष्णूला तिळापासून बनवलेली मिठाई अर्पण करावी.
हेही वाचा :Today Horoscope : 'या' राशींच्या लोकांनी व्यवहारात हट्टीपणा सोडावा, वाचा, आजचे राशीभविष्य