हैदराबाद :नवरात्रीच्या या दिवसांमध्ये आदिशक्तिची पूजा आणि उपवास केल्यानं प्रत्येक मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. नवरात्रीच्या काळात लोकांना सात्विक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. जे उपवास करतात, त्यांची सर्वात मोठी समस्या ही असते की त्यांनी उपवासात काय खावे, जे खाल्ल्यानंतर त्यांचा आहार बिघडणार नाही. जर तुम्हाला उपवासात पदार्थ बनवताना तुमच्या आहाराची काळजी घ्यायची असेल, तर तुम्ही हे पदार्थ करून पाहू शकता.
साबुदाणा खिचडी : उपवासासाठी उत्तम पर्याय म्हणजे साबुदाणा खिचडी. ती बनवणं खूप सोपं आहे. खिचडी खूप चविष्टही असते.
फळांची मिसळ : ऐकायला विचित्र वाटत असलं तरी हा संपूर्ण सात्त्विक आहार आहे. जर तुम्ही उपवासात खाण्यासाठी काही आरोग्यदायी पर्याय शोधत असाल तर 'फ्रूट मिसळ' हा एक चांगला पर्याय आहे. त्यात हलकं मीठ आणि लिंबू टाकून तुम्ही त्याची लज्जत वाढवू शकता.
बकव्हीट चीला : उपवासाच्या वेळी लोक गव्हाच्या पिठाचे पदार्थ मोठ्या उत्साहानं खातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही जास्त तेलकट नसलेले पदार्थ खाण्याचा विचार करत असाल, तर 'बकव्हीट चीला' हा एक उत्तम पर्याय आहे.
माखणा लाडू: जर तुम्ही काही आरोग्यदायी खाण्याचा विचार करत असाल तर नवरात्री सुरू होण्यापूर्वी मखनाचे लाडू तयार करा. तुम्ही ते दुधासोबत खाऊ शकता. हे खाल्ल्याने तुमचे पोटही भरलेलं राहतं.