सेक्स अॅडिक्शनला आधी अंतरराष्ट्रीय स्तरावर मानसिक विकारांमध्ये वर्गिकृत केले जात नव्हते, मात्र या समस्येच्या गंभीरतेला लक्षात घेत इंटरनॅशनल स्टेटिकल क्लासिफिकेशन ऑफ डिजीज अँड रिलेटेड हेल्थ प्रॉब्लेमद्वारे वर्ष 2022 मध्ये लागू होणाऱ्या आइसीडी 11 मध्ये सेक्सच्या व्यसनाची व्याख्या वेगळ्या प्रकारे केली जात आहे.
सेक्स अॅडिक्शन एक अशी अवस्था आहे ज्यात व्यक्तीचे आपले विचार आणि लैंगिक वर्तनावर नियंत्रण कमी होते आणि त्याच्या मनात नेहमी कामुक उत्तेजना किंवा सेक्सने भरलेले विचार असतात. त्याचबरोबर, त्याला वारंवार लैंगिक क्रिया करण्याची इच्छा होते, ज्याने त्याच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थाबरोबरच त्याच्या सामाजिक आणि भावनात्मक वर्तनावरही मोठा परिणाम होतो.
कंपल्सिव्ह सेक्सुअल बिहेव्हियर डिसॉर्डर असू शकते सेक्स अॅडिक्शन
उल्लेखनीय आहे की, आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेचे (आइसीडी 10) आणि अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ असोसिएशनद्वारे (एपीए) सेक्सच्या व्यसनाला मानसिक विकार म्हणून वर्गिकृत केले जात नव्हते, ज्याचे कारण होते वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या सेक्स ड्राइव्ह असणे. मात्र, आता या सिद्धांतात काही बदल आणले जात आहेत.
पुढील वर्षापासून लागू होणाऱ्या आइसीडी 11 मध्ये सांगण्यात आलेल्या सेक्स अॅडिक्शनच्या नव्या व्याखेनुसार, जर एखादी व्यक्ती आपल्या सवयीवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि वारंवार सेक्स करण्याकडे आकर्षित होत असेल तर, त्याचे हे वर्तन त्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक जीवनाला प्रभावित करत असेल तर, त्यास कंपल्सिव्ह बिहेव्हियर डिसॉर्डर समजले जाऊ शकते.
मे 2019 वर्ल्ड हेल्थ असेंबलीमध्ये प्रस्तुत करण्यात आलेल्या आईसीडी 11 नुसार, सहा महिने किंवा त्यापेक्षा आधिक वेळेत एखाद्या व्यक्तीमध्ये जर सेक्सची अनियंत्रित इच्छा होत असेल, त्याचे त्याच्या इच्छेवर नियंत्रण नसल्यास त्याचे एक विकार म्हणून निदान केले गेले पाहिजे.
काय आहे सेक्सचे व्यसन?
सेक्स अॅडिक्शनच्या गंभीरतेविषयी 'ईटीव्ही भारत सुखीभव'ला तपशीलवार माहिती देत वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वीणा कृष्णन सांगतात की, या सवयीमुळे पीडित व्यक्तीला पॉर्नोग्राफी आणि हस्तमैथूनचे व्यसन लागते. तेच अनेक प्रकरणात व्यक्ती आपली वासना शांत करण्यासाठी एकापेक्षा अधिक व्यक्तींशी आणि वेश्या व्यवसायात गुंतलेल्या स्त्रियांशीसुद्धा संबंध बनवू लागतो. योग्यवेळी या समस्येविषयी माहिती न झाल्यास आणि वेळेत उपचार न मिळाल्यास व्यक्ती आपल्या व्यसनामुळे स्वत:ला लैंगिक गुन्ह्यांमध्ये समाविष्ठ होण्यापासून देखील रोखू शकत नाही.
सेक्स अॅडिक्शनची कारणे
डॉ. कृष्णन सांगतात की, अनेकदा मानसिक आजारांमुळे, अस्वस्थ हार्मोन्समुळे, पॉर्नोग्राफी सारखी मेंदूला त्रास देणारी दृश्य सामग्री सतत पाहण्यामुळे, सोबत घडलेल्या एखाद्या दुर्घटनेमुळे किंवा शारीरिक आजारामुळे लोकांमध्ये हे व्यसन जन्म घेऊ शकते. त्याचबरोबर, नैराश्य, चिंता लर्निंग डिसेबिलिटी आणि पछाडणारी - सक्तीची प्रवृत्ती (obsessive - compulsive tendencies) यामुळे देखील व्यक्तीला हे व्यसन लागू शकते.