वॉशिंग्टन : झोप हा मानवी आरोग्यासाठी सर्वाधिक आवश्यक घटक आहे. मात्र अती झोप घेणे किवा कमी झोप घेणे मानवी आरोग्यास हानिकारक असल्याचा दावा बर्गन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. बर्गन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत जास्त झोप घेणाऱ्या नागरिकांसह कमी झोप घेणाऱ्या नागरिकांचाही सर्व्हे केला. त्यातून काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यामुळे जास्त झोप घेणे किवा कमी झोप घेणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.
जास्त झोप घेणाऱ्यांना संसर्ग :बर्गन विद्यापीठातील डॉ इंगेबोर्ग फोर्थन यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. यावेळी डॉ फोर्थन यांनी आम्हाला जास्त झोप घेणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या संसर्गाचा अभ्यास करायचा होता. त्यामुळे असा संबंध पाहिला असता, या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. याबाबतचे संशोधन फ्रंटियर्स इन सायकियाट्रीमध्ये प्रकाशित झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
झोपेच्या त्रासामुळे वाढतो संसर्गाचा धोका :बर्गन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार जास्त झोप घेणाऱ्या नागरिकांना अँटीबॉयोटिक्स घ्यावे लागत असल्याचे दिसून आले आहे. झोपेच्या त्रासांमुळे संसर्गाचा धोका वाढतो असा दावा या संशोधकांनी केला आहे. याबाबतचे पुरावे आधीच अस्तित्वात असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. झोप मोडणे किवा निद्रानाश हा सगळीकडे असलेली साधारण समस्या आहे. या समस्येचे निदान करने सहज सोपे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र जर नागरिकांना संसर्गाची लागण झाली तर मग त्यांना अँटीबॉयोटीक्स घ्यावे लागत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र सरासरी योग्य झोप घेणाऱ्यांना सर्दी किवा संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचेही यावेळी डॉ फोर्थन यांनी स्पष्ट केले आहे.