भारतात कोरोना विषाणूचा जो दुसरा आणि तिसरा प्रकार (व्हॅरिअंट) आढळला आहे, त्यांचे स्वरूप जवळपास एकच आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते, सध्या भारतात ज्या कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध आहेत, त्या या दोन्ही प्रकारावर अत्यंत प्रभावी आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायो मेडिकल जिनोमिक्सचे (जनुकीय) सौमित्र दास यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सार्स सीओव्ही-१९च्या जनुकीय क्रमसाखळी या विषयावर आयोजित एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. दास यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा दुसरा आणि तिसरा प्रकार केवळ चर्चेसाठी वेगवेगळा असली तरीही प्रत्यक्षात दोन्हींचा उल्लेख कोरोना विषाणूच्या बी १.१७ प्रकाराच्या संदर्भानेच केला जात आहे.
कोरोना विषाणूचा दुसरा आणि तिसरा प्रकार सारखाच, मात्र लस दोन्हींवर प्रभावी - वैज्ञानिकांचा दावा - corona variant
भारतात कोरोना विषाणूचा जो दुसरा आणि तिसरा प्रकार (व्हॅरिअंट) आढळला आहे, त्यांचे स्वरूप जवळपास एकच आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते, सध्या भारतात ज्या कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध आहेत, त्या या दोन्ही प्रकारावर अत्यंत प्रभावी आहेत.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकाराचे स्वरूप एकच आहे, असे त्यांनी सांगितले. विषाणूचे दुसरे आणि तिसरे रूप या शब्दाची व्याप्ती खूप जास्त असून वेगवेगळ्या संदर्भात त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख केला जात आहे, असेही ते म्हणाले. द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक्स ही संस्था कल्याणी येथे असून ती जैव तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येते. तसेच देशात कोरोना विषाणूच्या जनुकीय क्रमसाखळीवर ज्या दहा प्रयोगशाळांमध्ये प्रयोग केले जातात, त्यापैकी ही एक संस्था आहे. गुरूवारी भारतात विषाणूच्या एका नव्या प्रकाराचा शोध लागला असून त्याचा प्रसार अत्यंत वेगाने होऊ शकतो, असे मानले जाते. तसेच मानवी शरिरातील जी प्रतिकारक्षमता असते (अँटीबॉडीज) त्यातूनही हा विषाणूचा प्रकार सहीसलामत सुटून जाण्यास सक्षम असतो, असेही समजले आहे. मात्र देशात किंवा पश्चिम बंगालमध्ये कोरोना संसर्गाच्या केसेसमध्ये अत्यंत वेगाने वाढ होत असली तरीही त्यासाठी हा नवा प्रकारच जबाबदार आहे, असे मानण्यास काहीही पुरावा नाही, असेही मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे.
कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकाराचा शोध प्रथम पश्चिम बंगालमध्येच लागला आहे. त्याला बी १.६१८ असे नाव देण्यात आले आहे आणि ही आवृत्ती बी १.६१७ पेक्षा वेगळी आहे. याला
स्वतःमध्ये दुहेरी उत्परिवर्तन (म्युटेशन) घडवणारा विषाणू म्हणूनही ओळखले जाते. भारतात दुसऱ्या कोरोना लाटेत रूग्ण सापडण्याच्या संख्येत जी वेगाने वाढ होत आहे, त्याला हा दुसरा
प्रकारच कारण आहे, असेही मानले जाते. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या प्रकाराबाबत काळजी करण्याची आवश्यकता नाही, असे नवी दिल्ली येथील सीएसआईआर-इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक एंड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजीचे (सीएसआईआर-आईजीआईबी) संचालक अनुराग अग्रवाल यांनी म्हटले आहे. बी १.१६८ संदर्भात संशोधन सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच बी १.१६८ सार्स सीओव्ही-२च्या
विषाणूचेच नवे रूप आहे.