सार्स कोव्ह - 2 या विषाणूमुळे कोविड 19 आजार होतो. या विषाणूचे अनुवांशिक मटेरिएल हे अस्तित्व वाढवण्यासाठी आपले आकार आणि रचना बदलू शकतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हा शोध कोरोनावर उपचार करण्यासाठी प्रभावशाली औषधे निर्माण करण्यात मदत करेल असे देखील संशोधकांचे म्हणणे आहे.
स्ट्रेट टाईम्सच्या वृत्तानुसार, ड्यूक - एनयूएस वैद्यकीय शाळा, जिनोम इन्स्टिट्यूट ऑफ सिंगापोर (जीआयएस) आणि बायोइन्फोरमेटिक्स इन्स्टिट्यूट (बीआयआय) च्या संशोधकांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आभ्यासातून असे लक्षात आले आहे की, विषाणूचे रायबोन्यूक्लिक अॅसिड (ribonucleic acid (RNA)) हे संक्रमित पेशींच्या आत असताना आपल्या विकास आणि अस्तित्वासाठी गुंतागुंतीच्या आणि गतिमान आकारात बदलू शकते.
विषाणूचे रायबोन्यूक्लिक अॅसिड (RNA) हे बऱ्याच मानवी पेशींच्या आरएनएवर क्रिया करू शकते (interact). याचा वापर विषाणू स्वत:च्या अस्तित्वासाठी करतो, असे देखील पथकाने शोधून काढले आहे.
मानवी पेशींमध्ये असताना विषाणूने घेतलेला आकार, याबद्दल समजून घेण्याबरोबरच, रायबोन्यूक्लिक अॅसिडला (RNA) लक्ष करणाऱ्या औषधांसाठी विषाणूचे आकार महत्वाचे आहे, असे देखील लक्षात आले आहे, ज्याने आम्हाला हा प्रकल्प सुरू करण्यास प्रवृत्त केले, अशी माहिती द लेबॉरेटोरी ऑफ आरएनए अँड स्ट्रक्चरचे गट नेते डॉ. वान यू यांनी सांगितली. हे निष्कर्ष साईंटिफिक जर्नल नेचर कॉम्यूनिकेशनमध्ये प्रकाशित झाले आहेत.
अँटिबॉडीज कसे विषाणूची प्रथिने (protein) आणि त्याच्या जिनोमशी इंटरअॅक्ट होतात याबद्दल बरेच संशोधन झालेले आहे, मात्र विषाणूने पेशींना संक्रमित केल्यानंतर तो मानवी पेशींबरोबर कसा इंटरअॅक्ट होतो, याबद्दल फारसे माहिती नाही.