महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Sankashti Chaturthi 2023 : काय आहे संकष्टी चतुर्थीचे महत्व; का साजरी करण्यात येते संकष्टी चतुर्थी - पूजा विधी

एका महिन्यात दोन संकष्टी चतुर्थी येतात. यातील एक चतुर्थी कृष्ण पक्षात येते, तर दुसरी संकष्टी चतुर्थी शुक्ल पक्षात येते. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांचा उपवास करण्यात येतो.

Sankashti Chaturthi 2023
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 2, 2023, 1:09 PM IST

Updated : May 8, 2023, 8:21 AM IST

हैदराबाद :संकष्टी चतुर्थी गणपतीला समर्पित करण्यात आलेली आहे. त्यामुळे महिला चतुर्थीला गणपतीची पूजा करुन उपवास धरतात. हा उपवास दोन प्रकारांनी करण्यात येत असून यात मिठाची संकष्टी चतुर्थी आणि पंचामृत संकष्टी चतुर्थी असे हे दोन प्रकार असतात. संकष्टी चतुर्थीला महिला मोठ्या प्रमाणात गणपतीची आराधना करतात. त्यामुळे जाणून घेऊ काय आहे संकष्टी चतुर्थीचे महत्व आणि पूजा विधी याबाबतची माहिती.

किती आहेत संकष्टी चतुर्थीचे प्रकार :संकष्टी चतुर्थीचा उपवास महिला मोठ्या भक्ती भावाने करतात. उपवास केल्यानंतर महिला गणपतीची पूजा करुन आराधना करतात. संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्याने गणपती प्रसन्न होऊन पाप हरण करुन घेतात, अशी धारणा आहे. एका महिन्यात दोन चतुर्थी येत असून पहिली संकष्टी चतुर्थी आणि दुसरी विनायकी चतुर्थी असे चतुर्थीचे दोन प्रकार आहेत. यातील पहिली संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षात येते, तर दुसरी विनायकी चतुर्थी शुक्ल पक्षात येते.

काय आहे संकष्टी चतुर्थीचे महत्व : संकष्टी म्हणजे संकटापासून सुटका असा त्याचा अर्थ होतो. भगवान गणेश बुद्धीचा स्वामी असून सगळ्या पापांचा नाश करणारी देवता आहे. त्यामुळे सगळे अडथळे दूर करणाऱ्या देवांचे प्रतिक म्हणून भगवान गणपतीला मानण्यात येते. गणपती बाप्पांचा उपवास केल्याने सर्व बाधा दूर होऊन पुण्य लाभत असल्याची अख्यायिका पुराणात सांगितली जाते. गणपती बाप्पाच्या संकष्टीचा उपवास कठोर आणि फळे आणि भाजीपाला खाऊन करणे आवश्यक आहे. संकष्टी चतुर्थीला साबुदाणा खिचडी, बटाटा आणि शेंगदाणे यांचाही आराहात समावेश करता येतो. भाविक सूर्योदयापासून ते चंद्र दर्शनापर्यंत उपवास करतात. रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडता येतो. त्यामुळे संकष्टी चतुर्थीला फार महत्व आहे.

कधी आहे संकष्टी चतुर्थी :प्रत्येक महिन्यात दोनवेळा संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येते. यातील एक कृष्ण पक्षात येणारी संकष्टी चतुर्थी असते, तर दुसरी शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी असते. या महिन्यात पहिली कृष्ण पक्षात येणारी संकष्टी चतुर्थी सोमवारी 8 मे रोजी येत असून तिचा पूजा विधी करण्याचा वेळ 09.53 हा आहे. विशेष म्हणजे चतुर्थीच्या रिक्ता तिथी ही रिक्ता संज्ञक म्हणून ओळखली जाते. रिक्ता संज्ञक तिथीत कोणतेही शूभ कार्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - मोहिनी एकादशी 2023 : कशामुळे साजरी करण्यात येते मोहिनी एकादशी, जाणून घ्या आख्यायिका

Last Updated : May 8, 2023, 8:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details