वॉशिंग्टन :कर्करोगाने जगभरातील अनेक नागरिकांना विळखा घातल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कर्करोगावर आतापर्यंत प्रभावी औषधी नसल्याने कर्करोगामुळे बळी जात होते. आता मात्र कर्करोगावर प्रभावी लस शोधल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. अँगवांड्टे केमी या जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे.
वाढते रोगप्रतिकारक शक्ती :बिजींगमधील बिंग यान, सिजींग लिऊ आणि त्यांच्या पथकाने दोन नवीन ब्रॉड-स्पेक्ट्रम अॅडज्युव्हंट्स तयार केले आहेत. हे संगणक आण्विक डिझाइन आणि मशीन लर्निंगचा वापर करून लसींना रोगप्रतिकारक प्रतिसाद वाढवू शकतात असा दावा या संशोधकांनी केला आहे. प्राण्यांच्या मॉडेल्समध्ये विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाविरूद्ध लसीकरणाचा प्रभाव वाढवण्यात सक्षम असल्याचेही या प्रकाशित झालेल्या संशोधनात दावा करण्यात आला आहे. अनेक दशकांपासून अल्युमिनियम लवण यशस्वीरित्या सहायक म्हणून वापरले जात आहेत. वैकल्पिकरित्या तेथे ऑइल-इन-वॉटर इमल्शन आहेत. ते रोगप्रतिकारक पेशींवर पॅटर्न रेकग्निशन रिसेप्टर्सना लक्ष्य करतात. या प्रकारच्या सहायकाच्या जुन्या आवृत्त्या पुरेशा प्रभावी नसून त्यांचे दुष्परिणाम असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
पेशींची करतात नोंद :या संशोधकांनी संगणकाच्या आधाराने आण्विक डिझाइन आणि मशीन लर्निंग वापरून हे संशोधन केले आहे. बिंग यान, सिजींग लिऊ आणि त्यांच्या पथकाने बीजिंगमधील पर्यावरण विज्ञान संशोधन केंद्र आणि कॅपिटल मेडिकल विद्यापीठ यांच्या मदतीने दोन नवीन उपकरणे तयार केली आहे. बीजिंगमधील चायनीज अकादमी ऑफ सायन्सेस विद्यापीठ आणि हांगझोऊ शांडॉन्ग फर्स्ट मेडिकल विद्यापीठ आणि शांडॉन्ग अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस, ग्वांगझो युनिव्हर्सिटी यांचाही यात सहभाग असल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले.