लॅन्सेट चाइल्ड अँड एडोलिसेंट हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, मुलांमध्ये दीर्घ काळापर्यंत कोरोनाची लक्षणे दिसून येण्याची शक्यता फार कमी असते. या आभ्यासासाठी कोरोना पीडित मुलांचे आई - वडील आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांद्वारे अॅपच्या माध्यमातून शेअर केलेल्या डेटाच्या आधारावर आकडे तयार करण्यात आले होते.
किंग्स कॉलेज लंदनच्या संशोधकांद्वारे करण्यात आलेल्या या शोधानुसार लाँग कोविड किंवा दीर्घ काळापर्यंत कोरोनाची लक्षणे किंवा पार्श्व परिणामांचा अनुभव घेणाऱ्या मुलांची संख्या तुलनेने कमी असते. तेच तुलनात्मक आभासाबाबत बोलल्यास, प्रौढांमध्ये लाँग कोविड आणि संसर्गाचे पार्श्व परिणाम दीर्घ काळापर्यंत दिसत राहतात.
या आभ्यासात ब्रिटेनच्या 5 ते 17 वर्षे वयोगटातील त्या 2.5 लाख मुलांचा समावेश करण्यात आला होता जे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 मध्ये आयोजित झालेल्या या संशोधनात असे दिसून आले की, या दरम्यान 1 हजार 734 मुलांना संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यात हळू हळू कोरोनाची लक्षणे विकसित होण्यास सुरुवात झाली होती. संशोधनादरम्यान संसर्ग झालेल्या मुलांच्या निरीक्षणातून असे समोर आले की, बहुसंख्य मुलांमध्ये 6 दिवसांमध्ये संसर्गाची लक्षणे कमी होत होती आणि ते लवकर बरे देखील झाले.