महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Relationship Advice : पुरुषांच्या 'या' सवयी पार्टनरला आवडत नाहीत; जाणून घ्या कोणत्या आणि लगेच करा बदल

Relationship Advice : पुरुषांच्या काही सवयी असतात ज्या महिलांना आवडत नाहीत. जर तुम्ही विवाहित असाल किंवा तुमची गर्लफ्रेंड असेल तर या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुमचं नाते चांगलं राहील.

Relationship Advice
पुरुषांच्या 'या' सवयी पार्टनरला आवडत नाहीत

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 2:05 PM IST

हैदराबाद Relationship Advice :नवरा बायको असो किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड प्रत्येक नात्यात दोन्ही बाजूंनी नात टिकवण्याटी इच्छा असणं आवश्यक असतं. जर पहिला माणूस रुसला तर दुसरा जातो आणि त्याची समजूत काढतो, त्याची काळजी घेतो. जर दुसरा रुसला तर पहिला जातो आणि त्याची काळजी घेतो. असंच कोणतंही नातं शेवटपर्यंत टिकून राहतं. जर नातेसंबंधाचा विचार केला तर महिलांना त्यांच्या जोडीदारामध्ये काही गोष्टी लक्षात येतात जसे की समोरच्या व्यक्तीची विचारसरणी कशी आहे, त्याचा स्वभाव, तो इतरांशी कसा वागतो इत्यादी. नात्यातील या गोष्टींमुळे तुमचं नातं एकतर मजबूत होतं किंवा ते कमकुवत होऊ शकतं. कारण काहीवेळा तुमच्या नकळत सवयी देखील नात्यातील गोडवा हरवण्याचं कारण बनू शकतात. त्या गोष्टी तुम्ही ताबडतोब बदलल्या पाहिजेत. जाणून घ्या त्या सवयींबद्दल ज्या महिलांना आवडत नाहीत किंवा ज्यामुळे तुमचं नातं कमकुवत होऊ शकतं.

भावनिकरित्या न समजून घेणे : स्त्रियांना त्यांच्या जोडीदाराने त्यांचं ऐकावं, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी आणि त्यांना भावनिक आधार द्यावा असं वाटतं. त्याचवेळी बरेचदा मुले या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. जेव्हा ते तुमच्याशी काही शेअर करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पुरुषांना समजत नाही, यामुळे महिला नाराज होतात. पुरुषांनी असं सतत केलं तर नातंही तुटू शकतं. त्यामुळे पुरुषांनी याची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि महिलांना भावनिक आधार दिला पाहिजे.

जबाबदाऱ्या गांभीर्याने न घेणे : स्त्रिया अनेकदा आपल्या कुटुंबाची आणि घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात. पण घरातील कोणत्याही कामासाठी जोडीदाराची गरज भासत असेल आणि अशा स्थितीत तो घरच्या कामात मदत करत नसेल, तर महिलांनी ती गोष्ट चांगली नाही वाटत. समजा तुम्ही बाजारात जात आहात, तुमचा पार्टनरनं तुम्हाला काही गोष्टी आणायला सांगितलं आणि तुम्ही ते करायला विसरलात तर काय होईल हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तुम्ही पाहिलं असेलच की अनेक लोक आपल्या पत्नीला घरातील कामात मदत करतात आणि त्यांचं नातं किती चांगलं टिकतं.

टॉक्सिक रिलेशनशिप : कोणतंही नातं टॉक्सिसिटीवर नाही तर प्रेमावर चालते. खरं तर काही पुरुष सुरुवातीपासूनच कठोर असतात आणि भावना व्यक्त करत नाहीत. ज्यामुळे नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होतो. काही स्त्रियांना तुमची वागणूक आवडणार नाही आणि तुमच्याशी भावनिकरित्या संपर्क साधू शकणार नाही. म्हणून नेहमी खुलून मनमोकळे राहा आणि प्रेमाने कोणतीही परिस्थिती हाताळा. जर तुम्ही असं केलं नाही तर तुमच्या जोडीदाराला तुमचा कडकपणा आवडणार नाही.

प्रत्येक मुद्द्यावर महिलांना चुकीचे ठरवू नका :अनेक प्रकरणांमध्ये असं दिसून येतं की पुरुष प्रत्येक निर्णयावर महिलांना चुकीचे ठरवतात किंवा त्यांच्याशी अशा प्रकारे वागतात की त्या कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. अनेक स्त्रियांना त्यांच्या अनुभवांकडे, मतांकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा कमी लेखलं जातं तेव्हा अपमानास्पद वाटू शकते.

हेही वाचा ;

  1. Hyper Parenting Effects : हायपर पॅरेंटिंग म्हणजे काय ? काय होतो मुलांवर परिणाम...
  2. Relationship Tips : जेव्हा लाइफ पार्टनर रागाने बोलू लागतो, तेव्हा 'या' गोष्टी करा
  3. Relationship Tips : वैवाहिक जीवनात कंटाळा आलाय? 'हे' उपाय करा अन् नात्यात येईल रंगत

ABOUT THE AUTHOR

...view details