महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Ram Navami २०२३ : रामनवमीला बनवा या खास डिश, तुमचा सण होईल आनंदात साजरा - काळा चना

रामनवमीचा सण देशभरातील नागरिक मोठ्या जल्लोषात साजरा करतात. मात्र अनेक महिलांना उपवास असल्याने रामनवमीला कोणते पदार्थ करावे याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत.

Ram Navami Dishes
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 29, 2023, 4:27 PM IST

Updated : Mar 30, 2023, 6:27 AM IST

हैदराबाद : रामनवमी हा हिंदू सण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी हिंदू धर्मीय नागरिक उपवास करतात. मात्र उपवास केल्यानंतर नागरिकांना पूजा विधी करुन उपवास सोडणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणताही सण हा खाण्याशिवाय अपूर्ण असतो. पारंपरिक विधी पार पाडल्यानंतर तुम्हाला आवडेल अशा रामनवमीला बनवण्यासारख्या काही पदार्थांवर एक नजर टाकूया. हे पदार्थ तुम्हाला नक्की बनवायला आवडतील.

  • बटाटा भाजी :साधी पण सगळ्यांच्या आवडीची डिश म्हणजे बटाट्याची भाजी. अनेक मसाल्यांचा वापर न करता तिखट टोमॅटो सॉसमध्ये शिजवलेल्या बटाट्यापासून ही भाजी बनवली जाते. ही भाजी अगदी सोपी असल्याने सणांमध्येही बनवली जाते. ही भाजी तुम्ही पुरी, पराठा आणि चपातीबरोबरही छान खाऊ शकता.
आलू भाजी
  • सिंघाडा पुरी :सिंघाडा पुरी ही फुगीर ब्रेड बनवण्यासाठी बटाट्यासह तांबूस पिठाचा वापर केला जातो. तुम्ही रामनवमीच्या व्रतानंतर कढी, भोपळ्याची भाजी किंवा आलूपालक भाजीसोबतही ही पुरी खाऊ शकता.
पुरी
  • पुरण पोळी :ही अत्यंत स्वादिष्ट महाराष्ट्रीयन डिश तिच्या अनोख्या चवीमुळे तुम्हाला तृप्त करण्यासाठी पुरेशी आहे. पुरण पोळी ही चणाडाळ गूळ, वेलची आणि लोणी किंवा तूप टाकून बनवलेली गोड पोळी आहे. त्यामुळे पुरण पोळी तुमच्या रामनवमीचा उपवास सोडण्यास नक्की ट्राय करा.
पुरण पोळी
  • काळा चना :अष्टमी आणि रामनवमीचा सण काळ्या चण्याच्या डिशशिवाय अपूर्ण आहे. कोरड्या मसाल्यांनी तळलेले काळे चणे हा भारतातील प्रत्येकाला आवडणारा सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे.
काळा चना
  • मखना खीर :कोणताही सण मिष्टान्नाशिवाय अपूर्ण असतो. मखना खीर ही मलईदार डिश तुम्ही तांदळाची खीर बनवता तशीच बनवली जाते. तुम्हाला फक्त तांदळाच्या जागी मखना वापरायचा आहे. तो उपवासाच्यावेळी आणि नंतर खाण्यासाठी एक उत्तम आरोग्यदायी नाश्ता आहे. त्यात कोलेस्टेरॉल कमी असून पोटॅशियम भरपूर आहे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ही खीर फायदेशीर आहे.
खीर
  • नारळाचे लाडू :या रामनवमीला तुमच्या नेहमीच्या नारळाच्या लाडूला एक ट्विस्ट मिळेल. किसलेले नारळ बरोबर कंडेन्स्ड मिल्क घाला आणि नंतर साखर घाला. या साध्या घटकांसह तुमची गोड डिश काही मिनिटात तयार होईल.
  • हलवा :शुद्ध तूप आणि सुका मेवा वापरून बनवलेली ही क्लासिक रव्याची खीर आपण कशी विसरू शकतो. त्यामुळे या रामनवमीला हलवा बनवून तुमचे व्रत आणखी अविस्मरणीय करा.

हेही वाचा - Wake Up Fresh : शांत झोपेसाठी अशी घ्या काळजी, सकाळ होईल ताजीतवानी

Last Updated : Mar 30, 2023, 6:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details