छिंदवाडा : राक्षसांचे गुरू म्हणून गुरु शुक्राचार्य यांना ओळखले जातात. १२ मार्चपासून शुक्राचार्य आपली मीन रास सोडून मंगळ राशीत प्रवेश करणार आहेत. मेष राशीत अगोदरच राहू विराजमान झालेला आहे. त्यामुळे 12 तारखेपासून राहू आणि शुक्राच्या युतीचा देशासह, परदेशातील स्थितीवरही परिणाम होणार आहे. शुक्राबद्दल नागरिकांमध्ये आजही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे सिद्धी योग महापीठाचे ज्योतिषाचार्य महंत डॉ. वैभव अलोनी यांच्याकडून शुक्राची वक्रदृष्टी नेमकी कोणावर पडणार आहे, कोणत्या राशीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे, याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
उत्तर दशा फल : शुक्राच्या दशेत व्यक्तीला वस्त्र, दागिने, मान-सन्मानासह नवीन कार्याची सुरुवात, वाहन सुख आदीमध्ये फायदेशीर ठरते. मात्र काही नागरिकांनी शुक्रामुळे रोग, व्यसनाची लागण होते. त्यासह काही जणांना शुक्राच्या दशेत हानी देखील होत असल्याचे दिसून येते.
राशीनुसार काय पडतो फरक :
मेष : शुक्र जर मेष राशीत असेल तर परदेश प्रवासामुळे मनात चंचलता येते. पण काही व्यसनामुळे हानी होऊ शकते.
वृषभ : शुक्र जर वृषभ राशीत असेल तर कन्या धनाची प्राप्ती होते.
मिथुन :जर शुक्र मिथुन राशीत असेल तर सुख, धनलाभ होते. त्यासह ग्रामीण भागातील व्यवसायात प्रगती होते.
कर्क : शुक्र जर मिथून राशीत असेल तर धनलाभ होते. त्यासह दागिने लाभ होतो. शुक्र कर्क राशीत असल्यास प्रेमही लाभते.
सिंह : शुक्र जर सिंह राशीत असेल आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. स्त्री किवा पुत्राला हानी होण्याची शक्यता असते. त्यासह नुकसान संभवते.
कन्या : शुक्र जर कन्या राशीत असेल तर आर्थिक संकट येण्याची शक्यता असते. कन्या किवा पुत्राकडून दु:ख होऊ शकते. विरोधही होऊ शकतो.
तुळ : शुक्र जर तुळ राशीत असेल तर कीर्ती मिळू शकते.
वृश्चिक : शुक्र जर वृश्चिक राशीत असेल तर वैभवात वाढ झाल्यामुळे आनंद मिळतो.
धनु : शुक्र जर धनु राशीत असेल तर प्रतिभेचा विकास झाल्यामुळे पुत्रांची प्रगती होते.
मकर : शुक्र जर मकर राशीत असेल तर चिंता संभवते.
कुंभ : शुक्र जर कुंभ राशीत असेल तर मानहानी होण्याची शक्यता आहे.
मीन : शुक्र जर मीन राशीत असेल तर व्यवसायातून नफा, राजकारणातून नफा होण्याची शक्यता आहे.
राहू-शुक्र युती प्रभाव : ज्योतिषाचार्य डॉ. वैभव अलोनी यांनी १२ मार्चपासून दैत्य गुरु शुक्राचार्य मेष राशीत प्रवेश करत आहेत. राहू आधीच या राशीत विराजमान आहे. मेष राशीमध्ये या संयोगाच्या प्रभावामुळे देश-विदेशात पाण्याची कमतरता, आगीची भीती, विषबाधा, युद्धजन्य परिस्थिती, राजकीय षडयंत्र होण्याची शक्यात आहे. राहू आणि शुक्राच्या संयोगामुळे कौटुंबिक सुखात घट होऊ शकते असेही ज्योतिषाचार्य डॉ. वैभव अलोनी यांनी स्पष्ट केले आहे. विविध प्रकारचे रोग, अन्नातून विषबाधासारखे आजार होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राहू-शुक्र योग बनवणार लहरी : राहू-शुक्र युतीचा प्रभाव व्यक्तीला लहरी बनवू शकतो. व्यक्तीला स्वातंत्र्यपणे इच्छा आहे. राहू ग्रहासोबत शुक्राची युती माणसाला चुकीच्या सवयींना बळी पडू पाडू शकते. यामुळे राहू हळूहळू व्यक्तीची नैतिकता ऱ्हास करू शकतो. त्यामुळे व्यक्ती चुकीचा मार्ग देखील अवलंबू शकते असेही ज्योतिषाचार्य डॉ. वैभव अलोनी यांनी स्पष्ट केले आहे. राहू शुक्राच्या युतीमुळे माणसाच्या जीवनात बदल घडतात. राहू कुंडलीत शुक्रासोबत असल्याने अनेक परिणाम दिसून येत असल्याचेही ज्योतिषाचार्य डॉ. वैभव अलोनी यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - Holi 2023 : अशी साजरी होते देशातील विविध राज्यांमध्ये होळी, जाणून घ्या खास पद्धती