हैदराबाद :Radish Health Benefits निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं हिरव्या भाज्या, धान्यं, फळं यासह अनेक गोष्टींचा आहारात समावेश करुन तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून मुक्ती मिळवू शकता. या आरोग्यदायी पदार्थांमध्ये मुळ्याचाही समावेश आहे. हे खाल्ल्यानं आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. मुळ्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन-ए, लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात.
मुळ्याचे फायदे :-
मुळ्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते : मुळा फायबरनं समृद्ध आहे. त्यामुळं पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. तसेच, जर तुम्हाला बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असेल, तर मुळा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मुळा खाल्ल्यानं हृदय निरोगी राहण्यासही मदत होते. तुम्ही तुमच्या आहारात मुळा अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता आणि भाजी म्हणून देखिल खाऊ शकता.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी मुळा फायदेशीर : बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळं तुम्ही हृदयाशी संबंधित अनेक समस्यांना बळी पडू शकता. त्यामुळं तुम्ही तुमच्या आहारात मुळा समाविष्ट करू शकता. मुळ्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात, ज्यामुळं हृदय निरोगी राहतं आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.