हैदराबाद : प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होतात, प्रतिकारशक्ती कमकुवत होते. वाढ खुंटते यासारखे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. प्रथिनांची कमतरता टाळण्यासाठी प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे. प्रथिने हे एक शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. हे स्नायूंच्या वाढीव्यतिरिक्त शरीराच्या अनेक कार्यांना प्रोत्साहन देते.
अशी लक्षणे दिसून येतात : शरीरात प्रथिनांच्या कमतरतेमुळे ऊती आणि अवयवांचे नुकसान होऊ शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. संसर्गाचा धोका वाढतो. प्रथिनांच्या कमतरतेमुळे थकवा, कमजोरी, कमकुवत हाडे, केस गळणे, नखे पांढरे होणे, अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसून येतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या गंभीर आजारांबद्दल तसेच प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे याबद्दल जाणून घ्या.
हे होतात गंभीर आजार :
क्वाशिओरकोर :क्वाशिओरकोर हा प्रथिनांच्या कमतरतेचा आजार आहे. वाढीसाठी पुरेशी प्रथिने न मिळणाऱ्या मानवी शरीरात या आजाराची लक्षणे दिसतात. पाय आणि ओटीपोटात सूज येणे, केस पातळ होणे आणि त्वचेच्या रंगद्रव्यात बदल होणे ही लक्षणे आहेत.
मॅरास्मस : प्रथिनांच्या कमतरतेचा रोग हा कुपोषणाचा एक गंभीर प्रकार आहे. यामध्ये शरीराचे अतिरिक्त भार कमी होऊन स्नायू कमकुवत होऊ लागतात. लक्षणांमध्ये अशक्तपणा, थकवा आणि स्नायूंच्या वस्तुमानात घट यांचा समावेश असू शकतो.
एडेमा : हा प्रथिनांच्या कमतरतेचा आजार आहे. ज्यामध्ये शरीरात द्रव तयार होतो. त्यामुळे घोट्याला, पायांना सूज येते. यामुळे तुमचे वजन वाढू शकते आणि श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
अशक्तपणा :प्रथिनांच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवतो. हि अशी स्थिती ज्यामध्ये शरीर पुरेशा लाल रक्तपेशी तयार करत नाही. याला अॅनिमिया म्हणतात. यामुळे तुम्हाला खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
उच्च प्रथिने युक्त अन्न :
मांस, पोल्ट्री आणि मासे: हे काही उच्च प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. प्रथिनांचे प्राणी स्त्रोत सामान्यतः आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व आवश्यक अमीनो ऍसिड प्रदान करतात.