हैदराबाद Pravasi Bharatiya Divas 2024 :देशाच्या विकासात त्यांच्या अनिवासी नागरिकांची भूमिका महत्त्वाची असते. भारतीय अनिवासी नागरिक जगभर पसरलेले आहेत. भारताच्या विकासात अनिवासी भारतीयांच्या योगदानाचं महत्व विषद करण्यासाठी 9 जानेवारी 2013 पासून प्रवासी भारतीय दिन साजरा केला जातो. या निमित्तानं जगभरातील भारतीय नागरिक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येतात. भारत सरकारला नवीन विकासात्मक विषयावर सूचना देतात. देशाच्या विकासात आर्थिक, तांत्रिक आणि इतर मुद्द्यांवर गुंतवणूक, सहकार्यासाठी सरकार अनिवासी भारतीयांना आवाहन करत असते.
काय आहे प्रवासी दिनाचा इतिहास :दक्षिण आफ्रिकेतील आंदोलन करुन महात्मा गांधी 9 जानेवारी 1915 रोजी भारतात परतले होते. भारतात परतल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भारतात आल्यानंतर महात्मा गांधी यांनी पत्नी कस्तुरबासोबत भारताचा दौरा करुन देशातील गरिबी पाहिली. याच काळात ब्रिटिशांनी रौलेट कायदा आणला होता. त्याला महात्मा गांधी यांनी विरोध केला. महात्मा गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनता ब्रिटिशांच्या विरोधात रस्त्यावर उतरली. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात याच दिवशी परतल्यानं, 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार :भारतीय नागरिक अनेक देशात स्थायीक झाले आहेत. त्यामुळं भारतीय नागरिकांच्या योगदानासाठी भारत सरकार सदैव प्रयत्न करत असते. भारत सरकारतर्फे अशा अनिवासी भारतीयांसाठी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 9 जानेवारीला भारतीय प्रवासी दिनानिमित्त देण्यात येतो. भारत सरकारकडून भारतीय वंशाच्या नागरिकांना आणि त्यांच्याकडून चालवण्यात येणाऱ्या संस्थाना हा पुरस्कार देण्यात येतो. भारताच्या विकासात महत्वाचा वाटा असलेल्या अनिवासी भारतीय नागरिकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. व्यवसाय, कला, तंत्रज्ञान, विज्ञान अशा विषयात कार्यरत अनिवासी भारतीयांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
या देशातील अनिवासी भारतीयांना पंतप्रधानांनी दिली भेट :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यांदरम्यान अनिवासी भारतीय नागरिकांना भेटतात. 15 जून 2014 ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 74 परदेश दौरे केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आली आहे. अनेक दौऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिवासी भारतीयांना भेटले आहेत. अनिवासी नागरिकांना, देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी पुढं येण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भूतान, ब्राझील, नेपाळ, जपान, अमेरिका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, फिजी, श्रीलंका, मॉरिशस, सिंगापूर, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, चीन, मंगोलिया, दक्षिण कोरिया, बांगलादेश, रशिया, संयुक्त अरब अमिराती, आयर्लंड, अमेरिका, तुर्की, मलेशिया, पाकिस्तान, इराण, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशियाला भेट दिली. या देशांच्या भेटीत त्यांनी अनेक देशातील अनिवासी भारतीयांनाही भेट दिली आहे.
हेही वाचा :
- 'जागतिक ब्रेल दिवस' २०२४; अंधांना ज्ञानाचा प्रकाश देणारे 'लुई ब्रेल'
- भारतात एकदा नव्हे, तर पाच वेळा साजरे केले जाते नवीन वर्ष, जाणून घ्या केव्हा आणि का साजरे केले जाते