हैदराबाद : प्रदोष काळाचे व्रत देशभरात साजरा करण्यात येते. भगवान महादेवाच्या भक्तांना प्रदोष काळाची इत्यंभूत माहिती असते. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत करण्यात येत असल्याचे ज्योतिष्यशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रदोष व्रत का साजरे करण्यात येते. प्रदोष व्रत केल्याने काय होतात फायदे याबाबतची माहिती आम्ही या लेखात देत आहोत.
का करण्यात येते प्रदोष व्रत : त्रयोदशीची तिथी महादेवाची पूजा करण्यास सर्वश्रेष्ठ असल्याचे ज्योतिष्यशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रदोष काळात महादेवाची पूजा केल्याने आणखी लाभदायक होत असल्याचे ज्योतिष्यशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. त्रयोदशीला प्रदोष काळ असणे प्रदोष व्रताचे खरे कारण आहे. त्यामुळे प्रदोष काळ सुर्यास्ताच्या अगोदर 45 मिनीटे आणि सुर्यास्तानंतर 45 मिनिटापर्यंत असतो.
किती असतात प्रदोष काळ :प्रदोष काळात महादेवाची पूजा केल्याने पुण्या मिळत असल्याची भाविकांची धारणा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या भक्तीभावाने प्रदोष काळात महादेवाची पूजा करतात. प्रदोष काळ विविध नावाने साजरा करण्यात येतो. यात प्रोदष जर साप्ताहिक दिवस सोमवारी येत असेल, तर त्याला सोम प्रदोष असे संबोधण्यात येते. मंगळवारी प्रदोष आल्यास त्याला भौम प्रदोष असे म्हणतात. त्याशिवाय शनिवारी प्रदोष आल्यास त्याला शनि प्रदोष असे संबोधले जाते.
कधी आहे प्रदोष काळ :हिंदू धर्मात प्रदोष काळाला महत्वाचे स्थान आहे. प्रदोष काळात प्रदोष काळ आगामी महिन्यात बुधवारी 3 मेला येत आहे. प्रदोष व्रत मंगळवारी 2 मेला रात्री 11 वाजून 18 मिनीटांनी सुरू होत आहे. तर बुधवारी रात्री 11 वाजून 50 मिनीटांनी संपणार आहे. त्यामुळे बुधवारी 3 मे रोजी प्रदोष असल्याने भाविक महादेवाची पूजा करणार आहेत. प्रदोष काळात महादेवाची पूजा केल्याने सगळ्या पापापासून मुक्ती मिळत असल्याची भक्तांनी श्रद्धा आहे.
हेही वाचा - Sita Navami 2023 : कधी आहे सीता नवमी, काय आहे सीता नवमीचे महत्व