महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

कोविडनंतर लवकर बरे होण्यासाठी तुमचा आहार कसा असावा ?

कोरोनानंतर पूर्ववत होण्यासाठी खरं तर सप्लिमेंटरी गोळ्या घेणे हा सोपा पर्याय असला तरीही त्याऐवजी सहज साधा आरोग्यदायी आहार कधीही चांगला. भूक लागत नसताना असा ठरवून केलेला आहार गरजेचा आहे. त्या निमित्ताने ई टीव्ही भारत सुखिभवच्या टीमने दिल्लीच्या मयूर विहार येथील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. रेणू गर्ग यांच्याकडून याबद्दल जाणून घेतले.

Post COVID diet
कोविडनंतरचा आहार

By

Published : Jan 7, 2021, 8:07 AM IST

हैदराबाद -कोविड १९ मधून बरे झाल्यानंतर आहारात सर्वोत्तम प्रथिने असायला हवी. शरीराची झालेली हानी भरून काढण्यासाठी त्यांची खूप गरज असते. तसेच ए, डी, ई व्हिटॅमिन्स आणि झिंक, मॅग्नेशियमसारखी खनिजेही आवश्यक असतात. अशा आहारामुळे तुम्हाला तुमची गेलेली शक्ती परत मिळतेच, पण याबरोबर तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि एकदाचे तुम्ही तुमच्या पायावर उभे राहताना इतर संसर्गांनाही यामुळे बाजूला ठेवले जाते.

प्रथिनांचे सेवन दिवसाला ७५ – १०० ग्रॅम असायला हवे. सर्वसाधारण निरोगी माणसाच्या गरजेपेक्षा हे प्रमाण दीड पट जास्त आहे. डाळी, शेंगदाणे, दूध आणि दुधाचे पदार्थ, दही, चीज, बेसन, नाचणी, पनीर, सोया, अंडी, मासे, पातळ मांस, कोंबडी, पांढरे तीळ यातून प्रथिनांचे सेवन करता येईल.

भरपूर पौष्टिक पदार्थ –

  • तुम्ही तुमच्या आहारात मोसमातली ताजी फळे खूप खा. तसेच वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या आहारात हव्याच. याशिवाय शेंगदाणे आणि बियाही खा. रंगबिरंगी फळे आणि भाज्यांतून व्हिटॅमिन्स, खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट मिळते. ते जलद बरे होण्यास मदत करते.
  • तूप, मलई, चीज, घरचे लोणी, एवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, शेंगदाणे आणि बिया यातून शरीराला चांगली चरबी मिळू शकते. दिवसाला ३० – ४० ग्रॅम चरबी आवश्यक आहे.
  • जास्त कॅलरीज म्हणजे संसर्गाशी लढण्यासाठीची जास्त उर्जा आणि लवकर बरे होण्याची क्षमता. यासाठी तुम्ही आहारात संपूर्ण धान्य, बटाटे, ब्रेड, पास्ता, तांदूळ, दूध, एवोकॅडो, गूळ आणि भाजलेले चणे यांचे सेवन करा.
  • तुम्ही तुमच्या आहारात लोणी, रागी, सोयाबीन, दूध आणि दुधाचे पदार्थ, कॅल्शियमयुक्त पदार्थ, अंजीर, मनुका, बदाम यांचा समावेश करून कॅल्शियमचे सेवन करा. ( कॅल्शियमचे उत्तम प्रकारे शोषण होण्यासाठी व्हिटॅमिन डी खायला विसरू नका )
  • व्हिटॅमिन सीयुक्त आहार - लिंबूवर्गीय फळे आणि संत्रे, लिंबू, आवळा, पेरू, ब्रोकोली, भोपळी मिरची, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि इतर हिरव्या पालेभाज्या ( हिवाळ्यात त्यांचे वेगवेगळे मोठ्या प्रमाणात आढळतात ) यावर भर द्या. व्हिटॅमिन सीमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • तुम्ही सारखे पाणी प्या. दिवसाला ३ – ४ लीटर पाणी हवेच. तसेच सुप, मटनाचा रस्सा, हर्बल चहा, काढा आणि कॅफेन नसलेले पेय प्या.
  • स्प्राउट आणि फर्मेंटेड पदार्थ – यामुळे तुमच्या शरीरात झिंक वाढते.
  • कमी प्रमाणात आणि जास्त वेळ जेवल्याने तुम्हाला आवश्यक ती पोषक द्रव्ये मिळतात. यामुळे जठराला सूज येणे, वजन वाढणे आणि अ‌ॅसिडिटी याला प्रतिबंध होतो.

कोविडनंतर बरे होण्यासाठी या गोष्टी टाळा –

चहा / कॉफी टाळा –कोविड १९ नंतर लोकांना श्वास घ्यायला त्रास, थकवा आणि दम लागणे या समस्यांना सामोरी जावे लागते. यापासून आराम मिळण्यासाठी कॅफिनयुक्त पेय टाळा. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, डिहायड्रेशन होते आणि रक्तदाब वाढतो.

धूम्रपान आणि मद्यपान सोडा - धूम्रपान केल्याने थेट आपल्या फुफ्फुसांचे नुकसान होते. धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

कोविड १९ मुळे चव आणि गंधावर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला अन्नावर इच्छा राहात नाही. तुम्हाला बाहेरचे चमचमीत पदार्थ खायचा मोह होऊ शकतो. पण तुमची सुरक्षा आणि बरे होणे हे अग्रगणी असल्याने तुम्ही घरचेच ताजे, सरळ साधे , घरी स्वच्छतेची काळजी घेत, प्रेमाने शिजवलेले अन्न खा. कुठलाही आहार पुरेशी झोप आणि व्यायामा अभावी प्रभावी होत नाही. म्हणून पुरेसा आराम करा आणि पुन्हा नेहमीसारखे होण्यासाठी थोड्या शारीरिक हालचाली करा.

डॉ. रेणु गर्ग या गेली २३ वर्षे जगभरात ( ऑनलाइन ) रुग्णांना वैयक्तिक आहार आणि जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन करतात. अधिक माहितीसाठी rghomoeo@yahoo.co.in येथे संपर्क करा.

ABOUT THE AUTHOR

...view details