नियमित व्यायाम केल्याचे अनेक फायदे आहेत जसेकी,तुमच्या आरोग्याचा धोका कमी होतो, वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हाडे आणि स्नायू मजबूत होतात. अधिक काळ जगण्याची शक्यता वाढते. दैनंदिन जीवनात काम करण्याची क्षमता सुधारते. तुमची त्वचा (Skin) सुंदर दिसेल. व्यायामाने शारीरिकच (physical health) नव्हे तर मानसिक आरोग्यही (mental health) उत्तम राहते. माणसाला नवीन उर्जा (Energy Increses) प्राप्त होते. अपरिहार्य परस्थितीत व्यायाम करणे शक्य नसल्यास, व्यक्ती सुदृढ झाल्यावर व्यायाम करु शकतो. कर्करोगा सारख्या अनेक आजारात रूग्णांसाठी (Cancer patients) व्यायामाचा फायदा मोठ्या प्रमाणावर मान्य केला गेला आहे.
मानसिक आरोग्य स्थिर बाब नाही : उत्तम स्वास्थ्य (Good Health) लाभावे यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. मानसिक आरोग्याच्या भावनिक पैलूचा जास्त विचार झालेला आढळून येतो. बऱ्याचदा एखादी कृती, घटना किंवा नातेसंबंधामुळे आपल्याला बरे वाटले की, आपल्याला वाटते- आपले मानसिक आरोग्य सुदृढ आहे. हे जरी खरे असले, तरीही मानसिक आरोग्य ही स्थिर बाब नाही. वेगवेगळ्या कारणांनी त्यात नियमित बदल होत राहतात. नियमित व्यायामामध्ये श्वासाचे व्यायाम, एरोबिक्स (Aerobics) आणि ताणण्याचे व्यायाम यांचा समावेश असावा. प्रत्येक मानसिक प्रक्रियेचे काहीतरी प्रयोजन व कार्य असून, मानसिक जीवन आणि वर्तन हे व्यक्तीच्या सक्रियरीत्या जुळवून घेण्याशी निगडित आहे, असे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ विलियम जेम्स यांचे मानणे होते.