महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

World Unborn Child Day 2023 : न जन्मलेल्या चिमुकल्यांची आठवण करुन देतो जागतिक अनबॉर्न चाईल्ड डे - बाळ

जागतिक पातळीवर गर्भपाताच्या विरोधात मोहीम राबवण्यात येते. याबाबत जनजागृती करण्यासाठी २५ मार्च हा न जन्मलेल्या मुलांच्या आठवणीसाठी जागतिक अनबॉर्न चाईल्ड दिवस साजरा करण्यात येतो.

World Unborn Child Day 2023
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 24, 2023, 9:47 PM IST

हैदराबाद : गर्भपाताच्या निषेधार्थ दरवर्षी 25 मार्चला गर्भपातविरोधी दिन साजरा करण्यात येतो. गर्भपातामुळे न जन्मलेल्या बालकांना जगण्याच्या हक्काचे स्मरण आणि समर्थन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय न जन्मलेल्या बालकाचा दिन साजरा करण्यात येतो. न जन्मलेल्या बालकाचा आंतरराष्ट्रीय दिवस जागतिक स्तरावर गर्भपाताच्या विरोधात आवाज उठवून विरोध करण्यासाठी साजरा करण्यात येतो.

महिलांचे होतात सक्तीने गर्भपात :चिमुकल्यांचा जन्म होण्यापूर्वी मृत्यू होणे गर्भाचा अयोग्य विकास, गर्भवती स्त्री आणि गर्भाचा अशक्तपणा किंवा गर्भातील गंभीर आजार आदी कारणामुळे चिमुकल्यांचा मृत्यू होतो. काहीवेळा गर्भातील मुलाची किंवा आईच्या स्थितीमुळे डॉक्टर आरोग्याच्या कारणास्तव गर्भपात करण्यास सांगतात. परंतु त्याचवेळी अल्पवयीन गर्भधारणा, लैंगिक हिंसा, अवांछित गर्भधारणा, लिंग प्राधान्य, आर्थिक अडचण आणि सामाजिक, आर्थिक कारणांमुळे महिलांना सक्तीने गर्भपात करावा लागतो. त्यामुळे गर्भात असलेल्या बाळाचा जगण्याचा हक्क हिरावला जातो.

गर्भपाताच्या विरोधात कडक कायदे :आपल्या देशात गर्भपाताच्या विरोधात कडक कायदे आहेत. काही विशेष परिस्थिती वगळता गर्भपात हा दंडनीय गुन्हा मानला जात आहे. त्यामुळे सर्व सरकारी आणि निमसरकारी रुग्णालय गर्भपातास परवानगी देत ​​नाहीत. बरेच जण नोंदणी नसलेल्या रुग्णालयात गर्भपात करण्याचा प्रयत्न करतात. या संस्था असुरक्षित पद्धतीने गर्भपात करतात.

भारतात होतात १ कोटी ५६ लाख गर्भपात :जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी सुमारे 40-50 दशलक्ष गर्भपात केले जातात. तर दररोज सुमारे 1 लाख 25 हजार गर्भपातांच्या घटना घडतात. एकट्या युनायटेड स्टेट्समध्ये दरवर्षी 24 हजार मुले मृत जन्माला येतात. गर्भधारणेच्या 28 आठवड्यांनंतर 60 टक्के गर्भ वेगवेगळ्या कारणांमुळे मरत असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. दुसरीकडे भारतात दरवर्षी सरासरी 1.56 कोटी गर्भपात होतात. त्यापैकी सुमारे 95 टक्के म्हणजेच सुमारे 1.48 कोटी गर्भपात खाजगी रुग्णालयात होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

अवैध मार्गाने होतात ७४ टक्के गर्भपात :देशभरातील केवळ 16 हजार 296 खाजगी रुग्णालयात आरोग्य किंवा इतर तातडीच्या कारणांमुळे MTP कायद्यांतर्गत (मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा 1971) गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आल्याचे सरकारी आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. परंतु तरीही मोठ्या संख्येने दरवर्षी गर्भपात केला जातो. अमेरिकेच्या गुटमॅचर विद्यापीठाने 2015 मध्ये भारतातील गर्भपाताशी संबंधित विषयावर संशोधन केले होते. भारतातील 6 राज्यात केलेल्या या संशोधनात तब्बल 74 टक्के गर्भपात हे मान्यता नसलेल्या संस्थांमध्ये होत असल्याचे स्पष्ट झाले होते. मातेच्या पोटात 24 व्या आठवड्यानंतर किंवा जन्माच्या वेळी मृत झालेल्या मुलांची संख्या देखील खूप जास्त आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते 175 जन्म दरामागे 1 जन्म हा मृत असल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा - World Tuberculosis Day 2023 : जागतिक आरोग्य संघटनेचा क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाचा निर्धार, जाणून घ्या किती होतात टीबीमुळे मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details