महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

चिंतेने ग्रासलेल्या किशोरवयीन मुलांना मित्रांचा आधार लाभदायक ठरू शकतो - किशोरवयीन मुलांची चिंता

किशोरवयीन मुले मानसिकदृष्ट्या सर्वात जास्त कमजोर असतात. त्यांना अतिशय काळजीपूर्वक वागणूक द्यावी लागते. अनेकदा किशोरवयीन मुले नैराश्यचे शिकार होतात. अशावेळी पालकांपेक्षा त्यांना त्यांच्या मित्रांची सोबत जास्त फायद्याची ठरू शकते.

teens
किशोरवयीन मुले

By

Published : Jan 21, 2021, 6:11 AM IST

हैदराबाद - प्रत्येक तीन पालकांपैकी एका पालकाचा, मुलांना बरोबरीच्या मुलांनी आधार देण्यासारखा मानसिक आरोग्याचा कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यास जोरदार पाठिंबा असतो, असे एका नव्या जनमत चाचणीत आढळले आहे. या चाचणातून असे संकेत मिळाले आहेत की, अंदाजानुसार प्रत्येक पाच किशोरवयीन मुलांपैकी एकाला नैराश्य किंवा चिंताग्रस्तता असे मानसिक विकार असतात आणि किशोरवयीन मुलांमध्ये मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आत्महत्या हे आहे.

परंतु किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी आपले गुपित नेहमीच प्रौढ व्यक्तिकडे उघड करत नाही-ते कदाचित दुसऱ्या किशोरवयीन मुलामुलींशी बोलण्यास पसंती देतात.मानसिक प्रश्नांशी झगडणार्या किशोरांना त्यांच्या बरोबरीची मुले किंवा मुलीच बहुमूल्य असा आधार पुरवण्याची शक्यता असते कारण ते एकमेकांशी मनाने जोडलेले असतात, असे अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या सारा क्लर्क यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

काही मुलांना असे वाटते की, प्रश्न सांगितल्यावर त्यांचे आईवडिल अनावश्यक भडकरित्या व्यक्त होतील किंवा मुले कोणत्या मानसिक अवस्थेतून जात आहेत, हे ते समजू शकणार नाहित. शिक्षक आणि शाळेतील समुपदेशकांकडे विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी त्यांच्या इतर जबाबदार्यांतून मर्यादित वेळ असतो, असेही क्लर्क यांनी पुढे सांगितले. मिशिगन मेडिसिनमध्ये सीएस मॉट बाल रूग्णालयाने बालकांच्या आरोग्यावर घेतलेल्या जनमत चाचणीनुसार, तीन चतुर्थांश पालकांचे असे मत होते की किशोरांसमोरील आव्हाने शिक्षक किंवा शाळेतील समुपदेशकांच्या तुलनेत त्यांच्य बरोबरीची मुलेच जास्त चांगली समजून घेऊ शकतात. बहुसंख्य पालक हेही मान्य करतात की शाळेत पुढे होऊन आधार देणारी बरोबरीची मुले अधिकाधिक किशोरवयीन मुलामुलींना कुणाशी तरी आपल्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर बोलण्यास प्रोत्साहन देऊ शकतील. या चाचणीत असे आढळले आहे की ३८ टक्के पालकाना असे वाटते की त्यांचा स्वतःचा मुलगा किंवा मुलगी अशा मानसिक आरोग्याच्या प्रश्नाशी संघर्ष करत असेल तर, तो किंवा ती बरोबरीच्या आधार देणार्या मुलांच्या नेत्याशीच बोलण्याची जास्त शक्यता आहे आणि ४१ टक्के पालक असे म्हणतात की त्यांचा किशोरवयीन मुलगा या पर्यायाचा लाभ घेणे शक्य आहे.

२१ टक्के पालक असे म्हणतात की बरोबरीच्या मार्गदर्शकाकडून आपली मुलगी किंवा मुलगा आधार घेण्याचा प्रयत्न करेल,याची शक्यता नाहि. राष्ट्रीय प्रतिनिधित्व करणाऱ्या या जनमत चाचणीत १३ ते १८ वयोगटातील मुले मुली असलेल्या एक हजार पालकांच्या उत्तरांचा समावेश या अहवालात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details