नवी दिल्ली :लहान मुलांना बालपणी फुफ्फुसाच्या क्षयरोगाचे (PTB) निदान झाल्यास त्यांना नंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. यात फुफ्फुसाच्या खराब कार्यासह कमी उंची आणि वजन कमी वाढत असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. हे संशोधन अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातील स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी केले आहे. याबाबतचे संशोधन अमेरिकन जर्नल ऑफ रेस्पिरेटरी अँड क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये प्रकाशित केला आहे.
मुलांचे वजन आणि उंची होती कमी :चिमुकल्यांना क्षयरोगाचा त्रास होता, त्यांना वयाच्या पाच वर्षापर्यंत वजन आणि उंची कमी असल्याचा त्रास होता. या संशोधनाचे केप टाऊन विद्यापीठातील संशोधक लिओनार्डो मार्टिनेझ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी जन्मापासून 1 हजार 068 मुलांच्या समूहावर संशोधन केले. मार्च २०१२ ते मार्च २०१५ या कालावधीत केपटाऊनच्या बाहेरील समुदायात याबाबतचे संशोधन करण्यात आले. यावेळी संशोधकांना संशोधनातील मुलांना वयाच्या एक वर्षापूर्वी क्षयरोग झाला होता, त्यांचे वजन आणि बीएमआय त्यांच्या वयानुसार पाच वर्षांचे होईपर्यंत कमी होते. एक ते चार वर्षांच्या दरम्यान PTB विकसित केला त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी लांबी असल्याचेही या संशोधनात आडळून आले.