शिकागो : जगभरात सध्या यकृत रोगांचा प्रादुर्भाव ( फॅटी लिव्हर डिसीज ) वाढला आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. शिकागो येथील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयच्या तज्ज्ञांनी नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग असलेल्या 80 रुग्णांचा अभ्यास केला. ज्या रुग्णांनी व्यायाम करुन एक दिवस उपवास केला. त्यांना आरोग्य सुधारण्यास फायदा झाल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. तीन महिन्यातील केलेल्या या अभ्यासातून कोणत्याही निर्बंधाशिवाय खाणे आणि एक दिवस उपवास केल्याचा लाभ झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णांच्या यकृतातील चरबी, वजन, अॅलानाईज ट्रान्समिनेज एन्झाईम्सची पातळी कमी झाल्याचा अहवाल दिला आहे.
काय आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज : नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे काही लोकांच्या शरीरात अल्कोहोल कमी प्रमाणात असल्याने त्यांच्या शरीरात चरबी वाढवून जळजळीचा त्रास सुरू होतो. साधारणता कमी प्रमाणात पिणाऱ्या किंवा न पिणाऱ्या नागरिकांमध्ये हा त्रास जाणवतो. 65 टक्के लठ्ठ नागरिकांना हा आजार आहे. हा आजार इन्सुलिन प्रतिरोध आणि दुसऱ्या टाईपच्या मधुमेहाशी संबंधीत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास लिव्हर निकामी होण्याची शक्यता असल्याचेही तज्ज्ञांनी यावेळी स्पष्ट केले. फॅटी लिव्हर डिसीजमुळे रुग्णांना सोरॉयसिस किंवा यकृत निकामी होण्याची शक्यता असल्याने रुग्णांवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. उपचार करण्यासाठी काही चांगल्या औषधांचे पर्याय उपलब्ध असल्याची माहितीही तज्ज्ञ क्रिस्टा वराडी यांनी दिली आहे. या निष्कर्षांना आश्चर्यकारक असल्याचेही वराडी यांनी म्हटले आहे.
रुग्णांमध्ये आढळला हा बदल :अप्लाईड सायन्स कॉलेजच्या प्राध्यापिका क्रिस्टा वराडी यांनी हा प्रयोग करण्यासाठी काही रुग्णांचा ग्रुप तयार करुन त्यांची तपासणी केली. यात ज्या रुग्णांना पाच दिवस नियमीत व्यायाम करुन एक दिवसाचा उपवास केला, त्यांच्यात कमालीची सुधारणा दिसून आल्याचे वराडी यांनी सांगितले. मात्र काही नागरिकांनी फक्च व्यायाम केला, किवा फक्त उपवास केला, त्यांच्यात हा बदल दिसून आला नसल्याचे वराडी यांनी स्पष केले.