महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

ओएएस1 प्रथिनामुळे कोविडची तीव्रता होते कमी! - ओएएस1 मुळे कोविडची तीव्रता कमी

कोविड-19 विरोधात ओएएस1 चा संरक्षणात्मक प्रभाव असल्याचे आमच्या विश्लेषणात दिसून आल्याचे कॅनडाच्या मॉन्ट्रिएलमधील मॅकगिल विद्यापीठातील संशोधक ब्रेन्ट रिचर्डस् म्हणाले. कोविडवरील उपचार पद्धतींवर संशोधन सुरू असताना समोर आलेले हे निष्कर्ष अत्यंत महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.

ओएएस1 प्रथिनामुळे कोविडची तीव्रता होते कमी!
ओएएस1 प्रथिनामुळे कोविडची तीव्रता होते कमी!

By

Published : Mar 5, 2021, 1:34 PM IST

ओएएस1 या प्रथिनाचा कोविडच्या तीव्रतेशी संबंध असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. ओएएस1 चे प्रमाण वाढल्यास कोविडची तीव्रता आणि मृत्युचा धोका कमी होत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. नेचर मेडिसिन या नियतकालिकात याचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत. ओएएस1 चे प्रमाण वाढविणाऱ्या औषधांचा वापर कोविडवरील उपचारांत प्रभावी ठरण्याची शक्यता यामुळे व्यक्त केली जात आहे.

कोरोनावर उपचारासाठी निष्कर्ष महत्वाचे

कोविड-19 विरोधात ओएएस1 चा संरक्षणात्मक प्रभाव असल्याचे आमच्या विश्लेषणात दिसून आल्याचे कॅनडाच्या मॉन्ट्रिएलमधील मॅकगिल विद्यापीठातील संशोधक ब्रेन्ट रिचर्डस् म्हणाले. कोविडवरील उपचार पद्धतींवर संशोधन सुरू असताना समोर आलेले हे निष्कर्ष अत्यंत महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. या अभ्यासासाठी संशोधकांनी गौण रक्तात आढळणाऱ्या प्रथिनांवर लक्ष केंद्रीत केले. मात्र यातही कोणते प्रथिन महत्वाचे ठरू शकते हे ओळखण्याचे मोठे आव्हान होते. कारण कोविडच्या संसर्गामुळेही त्यांची पातळी प्रभावित होण्याची शक्यता असल्याचे संशोधक म्हणाले.

नव्या तंत्रज्ञानामुळे प्रथिन ओळखणे झाले शक्य

मात्र प्रोटिओमिक तंत्रज्ञान आणि मेन्डेलियन रॅन्डमायझेशनमुळे कोणत्या प्रथिनावर कोविडचा विपरित परिणाम होतो हे ओळखणे शक्य झाल्याने या प्रथिनाची ओळख पटविणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. या अभ्यासादरम्यान निरिक्षण केलेल्या 931 प्रथिनांमधून ओएएस1 चा कोविडच्या तीव्रतेशी संबंध असल्याचे संशोधकांना दिसून आले. याचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केल्यावर ओएएस1 च्या वाढलेल्या पातळीमुळे कोविडची तीव्रता कमी होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले.

ABOUT THE AUTHOR

...view details