हैदराबाद :गंभीर संसर्गजन्य रोगांवर उपचारात्मक लस विकसित करणाऱ्या नोव्हाव्हॅक्स इनकॉर्पोरेशन या बायोटेक्नॉलॉजी कंपनीने गुरुवारी फेज १ टप्प्यातील कोविड लसी संदर्भातील निरीक्षणे नोंदविणारी आकडेवारी जाहीर केली. या निरीक्षणामध्ये प्लेसेबो आधारित १८ ते ५९ वयोगटातील MTM मॅट्रिक्ससह किंवा त्याशिवाय रोगी- निरोगी प्रौढांमध्ये रँडम पद्धतीने लसीची चाचणी घेतली होती.
कोविड-१९ आजारावर मात केलेल्या रुग्णांमधील अँटीबॉडीजपेक्षा देखील अधिक ताकदवान आणि प्रभावी प्रतिपिंडे मॅट्रिक्स-एम सह संयोजित NVX‐CoV2373 लस दिलेल्या रुग्णामध्ये आढळून आले आहेत. दरम्यान हा सर्व डेटा तपासून पाहण्यासाठी किंवा इतरांना देखील त्याची सत्यता पडताळता यावी म्हणून वैज्ञानिक जर्नल आणि medRxiv.org.या ऑनलाइन प्रीप्रिंट सर्व्हरकडे देखील सादर केला गेला आहे.
NVX‐CoV2373 लस अधिक प्रभावी आणि सुरक्षा प्रदान करणारी असल्याचे आढळून आले आहे. रुग्णाच्या शरीरावर कोणत्याही साईड इफेक्टसशिवाय ही लस रुग्णाच्या शरीराशी जुळवून घेत आहे. लसीच्या पहिल्या डोसनंतर, डोकेदुखी, थकवा आणि स्नायूंमधील दुखणे यांसारख्या वेदना वैयक्तिक पातळीवर नेहमी ज्या पद्धतीने अतिशय कमी प्रमाणात आढळून येतात तशाच दिसून आल्याचे देखील निरीक्षण नोंदविले आहे. दुसऱ्या डोसनंतर देखील अपेक्षेप्रमाणे, मोठ्या प्रमाणात रिऍक्शनची नोंद झाली असली तरी जरी बहुतेक लक्षणे हे पहिल्या श्रेणीत आढळून येणाऱ्या लक्षणांपेक्षा खूप सौम्य आहेत. दरम्यान ही निरीक्षणे नोंदविण्यासाठी सरासरी कालावधी 2 दिवसांपेक्षा कमी होता.
दुसऱ्या डोसनंतरच्या २८ दिवसांच्या कालावधीत रुग्णावर परिणाम करणारे प्रतिकूल साईड इफेक्टस आढळून येतात किंवा नाही याविषयीची माहिती गोळा
करण्यात आली. त्यानुसार, (श्रेणी ३) कोणतेही गंभीर स्वरूपाचे परिणाम आढळून आले नाहीत आणि जे प्रतिकूल परिणाम नोंदविले गेले ते अतिशय सौम्य होते आणि त्यांचा लसीकरणाशी संबंधित नव्हत्या. कोणत्याही गंभीर प्रतिकूल घटना (एसएई) नोंदवल्या गेल्या नाहीत आणि सुरक्षितता पाठपुरावा सुरूच आहे.
सहभागींमध्ये NVX-CoV2373चा न्यूट्रल डोस देण्यात आला होता. यात डोसचे प्रमाण ५ μg इतके होते. लस दिलेल्या सर्वच रुग्णांच्या शरीरात एकाच डोसनंतर अँटी-स्पाइक IgG प्रतिपिंडे विकसित झाली, त्यापैकी बर्याचजणांमध्ये अतिशय प्रभावी अशी विषाणू-तटस्थ प्रतिपिंडे विकसित झाली. दुसऱ्या डोसनंतर १०० टक्के सहभागींमध्ये अतिशय प्रभावी अशी (वाईल्ड टाईप ) विषाणू-तटस्थ प्रतिपिंडे विकसित झाली. दोन्ही अँटी-स्पाइक IgG आणि व्हायरल न्यूट्रलायझेशन प्रतिक्रिया क्लिनिकली महत्त्वपूर्ण अशा कोविड -१९ रूग्णांना अनुकूल प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे, IgG अँटीबॉडीज तटस्थ टायटर्सशी (सीरमची सर्वाधिक सौम्यता) निगडित असल्याचे आढळून आल्याने या अँटीबॉडीज कार्यशील असल्याचे स्पष्ट झाले.
MTM मॅट्रिक्स-एमटीएम सहाय्यक पॉलिफंक्शनल CD4+ T पेशींना प्रतिसाद देतो. या सहाय्यकाचा २५ μg डोस आणि NVX‐CoV2373 चा ५ μg डोस सारखेच कार्य करतो. दरम्यान या दोन्हीची तुलना करता Th1 phenotype (IFN-g, IL-2, and TNF-a) च्या तुलनेत NVX‐CoV2373मध्ये रोगप्रतिकारक असलेल्या पॉलिफंक्शनल CD4+ T पेशींना अधिक प्रतिसाद देतो.
NVX-CoV2373 हा स्थिर असून आणि शीतगृहात किंवा कोल्ड स्टोरेज साखळीच्या व्यवस्थापनासाठी २ डिग्री सेल्सियस ते २ डिग्री सेल्सिअस तापमानात लिक्विड फॉर्ममध्ये साठवले जाऊ शकते.
"फेज १ च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की मॅट्रिक्स-एम अॅडजव्हंटसह NVX-CoV2373 कोविड-१९ लस विरोधात मजबूत इम्यूनिटी विकसित करतो," असे नोव्हाव्हॅक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे प्रेसिडेंट ग्रेगरी एम. ग्लेन म्हणाले.
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसिन येथील संशोधकांच्या मते कोविड १९मधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये विकसित अँटीबॉडीजच्या तुलनेत NVX‐CoV2373मधील न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी टायटर्स-अधिक प्रभावी आहेत. या चाचणीसाठी एपिडेमिक प्रीपेर्डन्स इनोव्हेशन्स (सीईपीआय) ने ऑस्ट्रेलियात दोन ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला.
नोव्हाव्हॅक्सने आपल्या निरीक्षणांच्या पडताळणीसाठी या लसीची चाचणी माकडांच्या एका प्रजातीवर करण्यात आली. श्वसनमार्गाच्या वरच्या व खालच्या भागात ही लस निर्जंतुकीकरण करून रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते ज्यामुळे कोविड १९चे संक्रमण होण्याची शक्ती निष्प्रभ ठरते. हा डेटा medRxiv.org या वेबसाईटवर देखील प्रकाशित करण्यात आला आहे.