महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Nobel Prize 2023: भारताचीही आहे नोबेल पुरस्कारांवर छाप; आतापर्यंत भारतानं 10 नोबेल पारितोषिकांवर उमटवली मोहर

Nobel Prize 2023 : वेगवेगळ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सध्या सुरू आहे. याची भारतात नेहमीच चर्चा होत असते. भारतानं आतापर्यंत 10 नोबेल पारितोषिकांवर मोहर उमटवली आहे. तर यंदाही नोबेल गौरवासाठी भारत प्रतीक्षेत आहे.

Nobel Prize 2023
नोबेल शांतता पुरस्कार

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 7:43 PM IST

हैदराबाद Nobel Prize 2023: या वर्षी देण्यात आलेली नोबेल पारितोषिके चांगलीच चर्चेत आहेत. नोबेल पारितोषिक विजेत्यांमुळे आपल्याला बौद्धिक सामाजिक आणि सर्वच क्षेत्रात कामगिरी तसंच दिग्गजांचा परिचय झाला. या दिग्गजांमध्ये अमेरिकेच्या प्रा. क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालं आहे. त्यांनी महिला श्रमाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी केलेलं समर्पण उल्लेखनिय आहे. त्यामुळे प्रा क्लॉडिया गोल्डिन यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात आलं आहे. भारतीयांनाही नोबेल मिळाली आहेत.

भारतानं 10 नोबेल पारितोषिकांवर उमटवली मोहर : 1901 मध्ये नोबेल पारितोषिकांच्या उद्घाटनाच्या घोषणेपासून, भारताने नऊ पारितोषिकांसह जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे. या उल्लेखनीय व्यक्तींमध्ये, रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यकृती 'गीतांजली'ने त्यांना 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवून दिले, तर सी.व्ही. रमण यांनी भौतिकशास्त्रात, अमर्त्य सेन अर्थशास्त्रात नोबेल मिळवले आणि कैलास सत्यार्थी यांनी आपले जीवन शांती आणि न्यायासाठी समर्पित केले, हे सर्व भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते आहेत.

भारतीय वंशाच्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार :नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या यादीचा सखोल अभ्यास करतो तेव्हा एक वेधक सत्य समोर येते. वैद्यकशास्त्रातील हरगोविंद खोराना, भौतिकशास्त्रातील सुब्रह्मण्यन चंद्रशेखर, रसायनशास्त्रातील वेंकटरामन रामकृष्णन आणि अर्थशास्त्रातील अभिजित बॅनर्जी यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींना भारतीय मूळ असले तरी, त्यांच्या नागरिकत्वामुळे परदेशी पुरस्कार विजेते म्हणून वर्गीकृत केले जाते. मदर तेरेसा या मूळच्या अल्बेनियाच्या आहेत. परंतु त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोलकात्याच्या गरजूंच्या सेवेसाठी समर्पित केले होते. त्यांना 1979 मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते.

'नरगिस मोहम्मदी' यांना शांततेचा नोबेल पुरस्कार: यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या 'नरगेस मोहमदी' (Nargis Mohammadi) प्रदान करण्यात आला आहे. मानवी हक्कांचं रक्षण करण्यासाठी नरगेस मोहम्मदी यांनी अतुलनीय कार्य केलं आहे. त्यामुळेच मानवी हक्क अबाधित ठेवण्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागतोय. मात्र तुरुंगवास भोगूनही त्यांनी मानवी हक्कासाठी सुरु केलेलं कार्य सोडलं नाही. त्यामुळेच त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी साहित्यातील नोबल पुरस्कारही मोठा चर्चेत आहे. साहित्यातील नोबेल पुरस्कार नॉर्वेच्या जॉन ओलाव फॉसे यांना प्रदान करण्यात आला. त्यामुळे जगभरातील साहित्य रसिकांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. आपल्या अतिशय कल्पक नाटकांमधून त्यांनी वास्तव लेखन केलं आहे. आपल्या विलक्षण प्रतिभेनं वाचक रसिकांसह त्यांनी समीक्षकांनाही भुरळ घातली आहे.

क्वांटम डॉट्सनं नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती : क्वांटम डॉट्सनं नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती केलं आहे. 2023 चे नोबेल पारितोषिक मौंगी जी. बावेंडी, लुईस ई. ब्रुस आणि अ‍ॅलेक्सी आय. एकिमोव्ह यांना प्रदान करण्यात आला आहेत. या तिघांनी क्वांटम डॉट्स क्षेत्रात अमूल्य असं योगदान देत संशोधन केलं आहे. या तिघांनी मिळून क्वांटम डॉट्सच्या क्षेत्रात संशोधन केलं असलं, तरी हे तिघंही वेगवेगळ्या देशाचं आहेत. मौंगी जी. बावेंडी हे फ्रान्सचे आहेत, अ‍ॅलेक्सी आय. एकिमोव्ह रशियाचे आणि ब्रुस हे युनायटेड स्टेट्सचे नागरिक आहेत. या तिघांनी नॅनोटोक्नॉलॉजीचं नाही, तर कर्करोगाविरोधातील लढ्यातही अमूल्य संशोधन केलं आहे.

साथीच्या रोगाविरुद्ध लढाईत आशेचा किरण : साथीच्या रोगानं जगभरात थैमान घातल्याचं अनेकवेळा स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच यावर्षी भौतिकशास्त्रातील नोबल पारितोषिक देण्यात आल्यानं चांगलीच चर्चा सुरू आहे. यावर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक अमेरिकेचे पियरे अगोस्टिनी, म्युनिक, जर्मनीतील फेरेंक क्रॉझ आणि स्वीडिश वंशाच्या अ‍ॅन ल'हुलियर यांना प्रदान करण्यात आलं आहे. या तिघांनी केलेल्या संशोधनात प्रकाशाचे अ‍ॅटोसेकंद स्पंदन निर्माण करतात. या तिन्ही संशोधकांनी इलेक्ट्रॉन गतिशिलता आणि अणू रेणूंमध्ये क्रांतीकारक संशोधन केलं आहे. कॅटालिन करिको आणि ड्रू वेसमन यांना संयुक्तपणानं औषधशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आलं. या तिघांनीही कोरोना लसीच्या संशोदनात अमुल्य योगदान दिलं आहे. कॅटालिन करिको हे मूळचे हंगेरीचे असून ते आता अमेरिकेत राहतात. अमेरिकेच्या ड्रू वेसमन यांनी साथीच्या रोगात महत्वपूर्ण संशोधन केलं आहे. विशेष म्हणजे या नोबेल पारितोषिकांध्ये अमेरिकेतील संशोधकांचा वरचष्मा असल्याचं दिसून आलं आहे.

हेही वाचा -

  1. Nobel Prize 2023 : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर, जाणून घ्या कार्य
  2. Nobel Peace Prize 2023 : तुरुंगात शिक्षा भोगत असताना मिळाला नोबेल पुरस्कार, जाणून घ्या कोण आहेत नर्गिस मोहम्मदी
  3. Nobel Prize In Literature : नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार

ABOUT THE AUTHOR

...view details