हैदराबाद - पालकत्वाच्या प्रवासाचा अनुभव घ्यायला जवळपास सर्वच उत्सुक असतात. काहींवर ही कृपा लगेच होते, तर काहींना मात्र जड अंत:करणाने आई आणि बाबा होण्याची वाट पहावी लागते. आपण वंध्यत्वाच्या समस्येची संख्या पाहतो, तेव्हा ते फक्त हिमनगाचे शिखर असते. कारण याच्याशी सामाजिक दृष्टिकोनही जोडला जातो. समाज म्हणून देखील वंध्यत्वाकडे आपण एक वैद्यकीय समस्या म्हणूनच पाहिले पाहिजे.
वंध्यत्व म्हणजे काय ?
एक वर्ष निरोधाचे कुठलेही साधन न वापरता संभोग करूनही स्त्री गर्भवती होत नसेल, तर ते वंध्यत्व असते.
वंध्यत्वाची कारणे?
वंध्यत्वाची अनेक कारणे आहेत. पत्नी आणि पती दोघांमध्येही हा दोष असू शकतो. स्त्री आणि पुरुषांमध्ये वंध्यत्वाची अनेक कारणे असू शकतात. मात्र, काहींमध्ये ठोस कारणे सापडत नाहीत. अशा समस्यांना ‘अनएक्सप्लेन्ड’ म्हटले जाते.
स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे -
- गर्भाशयातील अंड्यांची अयोग्य पद्धतीने वाढ
- एनोव्युलेशन (अंडाशयातून अंडी उत्पन्न न होणे)
- पोलिस्टिक ओव्हरीयन सिंड्रोम
- गर्भ नलिकेत दोष असणे
- गर्भाशयामध्ये दोष असणे
- शुक्राणूंच्या प्रवेशास अडथळा असणे
- एंडोमेट्रिओसिस (गर्भाशयाच्या बाहेर पेशींची वाढ)
- स्त्रीचे वाढते वय