हैदराबाद : Navratri २०२३ : शारदीय नवरात्री 2023, महाशक्तिच्या उपासनेचा महान उत्सव, अश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजे 15 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. नवरात्रीचा उत्सव 23 ऑक्टोबर, महानवमीपर्यंत चालेल. 23 ऑक्टोबर रोजी नवमी हवन आणि देवीची पूजा होणार आहे. उदयकालिक दशमीला म्हणजेच २४ ऑक्टोबरला सकाळी नवरात्रीचं व्रत संपेल. 24 ऑक्टोबरलाच देवीच्या मूर्तींचं विसर्जन होणार आहे.
9 दिवस पूर्ण होणं विशेष फलदायी : यावर्षी शारदीय नवरात्रीचे 9 दिवस पूर्ण होणं विशेष फलदायी मानलं जात आहे. शारदीय नवरात्रीचं महत्त्व सत्ययुगापासून चालत आलं आहे. मार्कंडेय पुराणात दुर्गा सप्तशतीच्या माध्यमातून देवीचं माहात्म्य प्रकट झालं आहे. शुंभ-निशुंभ आणि महिषासूर या सूडबुद्धीच्या राक्षसाच्या जन्मामुळं देव दुःखी झाल्याचं वर्णन आहे. सर्वांनी मिळून सर्व मानसिक शक्तीनं महामायेची स्तुती केली. तेव्हा देवीनं वरदान दिलं आणि देवांना म्हणाली, भिऊ नका, मी अनंतकाळात प्रकट होऊन अतुलनीय पराक्रमी राक्षसांचा वध करीन आणि तुमचे दुःख दूर करीन. माझ्या आनंदासाठी तुम्ही आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून घटस्थापना करून नवमीपर्यंत माझी पूजा करावी. याच आधारावर देवीचा नवरात्रीचा उत्सव अनादी काळापासून चालत आला आहे. हे व्रत नवरात्रीपर्यंत चालत असल्यानं या व्रताला 'नवरात्री' असं नाव पडलं.
का चालतात अनवाणी? : नवरात्रीच्या आधी पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होतो, असे म्हणतात. हा ऋतू खूप उष्ण किंवा थंडही नाही. सूर्यकिरणांपासून जास्तीत जास्त व्हिटॅमिन डी मिळवण्याचा हा ऋतू आहे. त्यामुळे या काळात अनवाणी राहणे फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की, या काळात पृथ्वी थोडीशी उबदार होते, अनवाणी चालल्याने तिची उष्णता शरीरात सहज पोहोचते. पावसाळ्यात शरीरात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते. पायातून होणारी ही उष्णता शरीराचे तापमान संतुलित ठेवते आणि शरीरातील थंडी कमी करून उष्णता वाढवते.