महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Stress Awareness Month 2023 : तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी साजरा करण्यात येतो तणाव जागृती महिना - मानसिक आरोग्याच्या समस्या

जगभरात तणावामुळे हजारो नागरिक आत्महत्येला बळी पडतात. त्यामुळे अशा तणावग्रस्त नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय तणाव जागृती महिना साजरा करण्यात येतो.

Stress Awareness Month 2023
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 31, 2023, 11:21 AM IST

Updated : Mar 31, 2023, 3:30 PM IST

हैदराबाद :तणावाला आळा घालून त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी ताणतणावाच्या वाढत्या घटनांची दखल घेऊन दरवर्षी एप्रिल महिन्यात तणाव जागरूकता महिना साजरा केला जातो. तणावावर मात मिळवून नागरिकांमध्ये जागरूकता करण्यासाठी तणाव जागृती महिन्याची संकल्पना पुढे आली आहे.

तणावाचा होतो आरोग्यावर विपरित परिणाम :तणाव ही आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या मानली जात आहे. आजच्या युगात जवळपास प्रत्येक वयोगटातील नागरिकांना वेगवेगळ्या कारणांमुळे कोणत्या ना कोणत्या तणावाचा सामना करावा लागतो. ताणतणाव ही सामान्य भावना असली तरी ती समस्या बनली आहे. त्याचा परिणाम आपल्या वागण्यासह शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसू लागतो. तणावाच्या वाढीमुळे पीडित व्यक्तीच्या दिनचर्येसह जीवन देखील प्रभावित होऊ शकते. तणावाचे नकारात्मक परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतात. नागरिक त्यांच्या तणावाचे व्यवस्थापन कसे करू शकतात, याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी एप्रिल महिना हा तणाव जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो.

तणावामुळे होतात मानसिक आरोग्याच्या समस्या :प्रत्येकाला आयुष्यात तणाव हा येतोच. परंतु जगभरातील लाखो नागरिक तणावाच्या नकारात्मक परिणामांमुळे दरवर्षी गंभीर समस्यांना बळी पडतात. चिंतेची बाब म्हणजे गंभीर तणावाचे निदान होऊनही मोठ्या संख्येने नागरिक तणाव व्यवस्थापनासाठी वैद्यकीय मदत घेण्यास धजावत नाहीत. तणाव केवळ अस्वस्थ भावना नसून त्यामुळे चिंता, नैराश्य, हार्मोनल समस्या, झोपेचा त्रास, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदींसह शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या देखील होऊ शकतात. तणावाची तीव्रता वाढण्याआधीच पीडित व्यक्तीला उपचारासाठी प्रवृत्त करने गरजेचे आहे. तणावाची कारणे, लक्षणे आणि व्यवस्थापन याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करता येते.

काय आहे तणाव जागरूकता महिन्याचा इतिहास :कामाच्या ठिकाणी होत असलेल्या तणावात मदत करण्यासाठी 1974 मध्ये एक संस्था स्थापन करण्यात आली होती. पुढे 1989 मध्ये या संस्थेचे नाव बदलून इंटरनॅशनल स्ट्रेस मॅनेजमेंट असोसिएशन असे करण्यात आले. या अंतर्गत दरवर्षी तणाव आणि संबंधित समस्यांवर अनेक प्रकारचे जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र 1992 मध्ये पहिल्यांदा तणाव जनजागृती महिना साजरा करण्यात आला होता. त्यानंतर दरवर्षी एप्रिल महिन्यात तणाव जागृती महिना साजरा केला जातो. याप्रसंगी अनेक जनजागृती कार्यक्रम, चर्चासत्रे, दौड आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यासह सरकारी आणि निमसरकारी संस्थांसह मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांच्याद्वारे मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते.

नागरिक मानसिक समस्यांनी आहेत ग्रस्त :तणावाची कोणतीही एक व्याख्या नसल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. तणाव अनेक कारणांमुळे होऊ शकतो. कौटुंबिक समस्या, कामाच्या ठिकाणी तणाव, परस्पर कलह, आर्थिक किंवा शारीरिक समस्या, आदी कोणत्याही कारणामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते भारतातील एकूण १० हजार नागरिकांपैकी सुमारे 2 हजार 443 नागरिक मानसिक समस्यांनी ग्रस्त आहेत. कोविडनंतर अनेक कारणांमुळे सामान्य लोकांमध्ये तणावाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. थोडासा ताण चांगला असल्याचे म्हणतात, मात्र तणाव ही मानसिक समस्या बनली तर त्याचे परिणाम खूप त्रासदायक होतात.

तणावामुळे आत्महत्येत झाली वाढ :एनसीआरबीच्या ( NCRB ) आकडेवारीनुसार 2021 मध्ये 13 हजार 792 नागरिकांनी मानसिक आजारामुळे आत्महत्येचा मार्ग पत्करला. इतक्या नागरिकांनी मानसिक आजाराने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून हे देशातील आत्महत्येचे तिसरे सर्वात मोठे कारण होते. आत्महत्या केलेल्या या एकूण नागरिकांपैकी 6 हजार 134 प्रकरणे 18 ते 45 वयोगटातील तरुणांचे होते. त्यांना कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावाचा सामना करावा लागत होता. दुसरीकडे मानसिक समस्यांनी ग्रस्त जगातील 15 टक्के नागरिक भारतीय असल्याचा दावा कन्सल्टन्सी एजन्सी डेलॉइटने केला आहे. 2021 आणि 2022 च्या मध्यापर्यंत याच एजन्सीने कामाची जागा आणि मानसिक आरोग्य या विषयावर भारतातील सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले होते.

हेही वाचा - Anandi Gopal Joshi : 10 दिवसांचे स्वत:चे मूल दगावल्याने थेट डॉक्टर होण्याचा निर्णय, वाचा आनंदी गोपाळ जोशींचा खडतर प्रवास

Last Updated : Mar 31, 2023, 3:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details