महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

National Safe Motherhood Day 2023 : भारतात दरवर्षी 45 हजार मातांचा होतो मृत्यू, जाणून घ्या राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाचा इतिहास - मातृत्व

भारतात दरवर्षी 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस 2023 साजरा करण्यात येतो. महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्यात येतो.

National Safe Motherhood Day 2023
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 8, 2023, 3:35 PM IST

Updated : Apr 11, 2023, 7:01 AM IST

हैदराबाद : जगभरात दरवर्षी लाखो मातांचा मृत्यू होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने चिंता व्यक्त करण्यात येते. मात्र भारतातही माता मृत्यूंचे प्रमाण मोठे चिंताजनक आहे. जगभरातील तब्बल 12 टक्के मातांचा मृत्यू भारतात होते. आकडेवारीत सांगायचे झाले, तर तब्बल 45 हजार मातांचे मृत्यू एकट्या भारतात होतात. त्यामुळे गरोदर महिला आणि मातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी भारतात दरवर्षी 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्यात येतो.

काय आहे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाचा इतिहास :जगभरात माता मृत्यूच्या होणाऱ्या घटनेमुळे नागरिकांमधून मोठी चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यातच व्हाईट रिबन अलायन्स इंडिया या 1800 संघटनेच्या मसूहाने भारत सरकारकडे याविषयी जनजागृती करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे भारत सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीने 2003 मध्ये कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्याचे घोषित केले. तेव्हापासून हा दिवस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

जाणून घ्या राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाचे महत्व :देशात दरवर्षी 45 हजार मातांना बाळाला जन्म देताना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते. तर प्रत्येकी एक लाख महिलांमधून 167 महिला बाळाला जन्म देताना आपला बळी देतात. त्यामुळे ही स्थिती सुधारण्यासाठी महिलांना गरोदरपणात आणि मातृत्व लाभल्यानंतरही आरोग्याच्या दर्जेदार सुविधा पुरवणे गरजेचे आहे. भारत सरकारने ही बाब विचारात घेऊन 2003 पासून राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्यास सुरुवात केल्यामुळे हजारो गरोदर महिलांना आरोग्याच्या विविध सुविधा पुरवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाला अनन्य सादारण महत्व प्राप्त झाले आहे.

माता मृत्यूचे प्रमाण घटल्याचा दावा :भारत सरकारच्या प्रयत्नामुळे देशात माता मृत्यूचा दर झपाट्याने घटत असल्याचा दावा करण्यात येत आहे. देशात माता मृत्यूंचा दर तब्बल 67 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. 1990 ते 2011 ते 2013 या तुलनेत माता मृत्यूचा दर तब्बल 67 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.

हेही वाचा - Babasaheb Ambedkar Jayanti 2023 : जगात गाजा वाजा ; जाणून घ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा इतिहास

Last Updated : Apr 11, 2023, 7:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details