हैदराबाद : कोलंबिया यानाने भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला यांनी अंतराळात झेप घेतली होती. नासाने केलेली ही अंतराळ मोहीम फत्ते करुन कल्पना चावला यांच्यासह सात अंतराळवीर परत येत होते. मात्र या कोलंबिया यानाचा अपघात झाल्याने सारे होत्याचे नव्हते झाले. यावेळी कल्पना चावला यांच्यासह अंतराळवीर परत येत असलेल्या कोलंबिया या यानाची चांगलीच चर्चा सुरू होती. नेमके कसे होते, कोलंबिया अंतराळयान, कधी झाली होती कोलंबियाची निर्मिती, कधी केले होते कोलंबिया यानाने आपले पहिले उड्डाण याबाबतची माहिती जाणून घेऊ या खास लेखातून.
काय आहे कोलंबिया यानाचा इतिहास :कोलंबिया यानाची बांधणी 1975 मध्ये नासाकडून करण्यात आली होती. उष्णतेचे नियमन करण्यासाठी कार्बन आवरण लावण्यात आलेले कोलंबिया हे एकमेव यान होते. हे आवरण यानाच्या पंखावर बसवण्यात आले होते. त्यानंतर या यानाच्या शेपटीतही 1992 मध्ये बदल करुन ते ड्रॅग शूट प्रकारचे करण्यात आले होते. कोलंबिया यानाने तब्बल 28 मोहिमा केल्या होत्या. कोलंबिया यानाची पहिली मोहीम 12 एप्रिल 1981 ला करण्यात आली होती. त्यानंतर 28 मोहिमा करणाऱ्या या यानाला कोणतीही अडचण आली नाही. मात्र 1 फेब्रुवारी 2013 ला मोहिमेवरुन परतताना या यानाचा अपघात झाला. या यानात असलेल्या 7 अंतराळवीरांचा या अपघातात मृत्यू झाला. यात भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला यांचाही समावेश होता.